महारणीच्या बोला । लक्ष द्या सांडोनी गलबला । जागे व्हा सांडोनी झोंपेला । जवळचि उभा काळ आला ॥ १ ॥

जोहार करतें धनी । पायां पडती महारिणी । विसरूं नका धन्याचे स्मरणीं । अंतीं यमाची जाचणी ॥ २ ॥

मी महारीण नोहें लहान । ब्रह्मा विष्णु शिव आदिकरून । माझें म्यांच केलें सगुण । आधीं होतें तें निर्गुण ॥ ३ ॥

माझें मीच जागें करून । केलें सगुणाचें निर्गुण । शरण एका जनार्दन । महारीण सांगे जीवींची खूण ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel