पायां पडत्यें महारीण आली ॥ध्रु०॥

महारिणीचे बोल ऐका । गांव वसाड पाडूं नका । हकनाक बसेल धक्का । इतुकें तुम्ही मनीं तर्का ॥ १ ॥

ब्रह्मा विष्णु दोन्ही बाळ । महाकाळाचे हे काळ । मज देखतां गोपाळ । ते मज महारिणीपासोनी ॥ २ ॥

एका जनार्दनीं महारीण झालें । सद्‍गुरूला शरण गेलें । यानें आपुलें स्वहित केलें । जन्ममरण विसरलें ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel