अभावाचे नाक लावुनिया शोभे ।

वरदळ भक्‍ती तैशावरी शोभे ॥ १ ॥

नकटीचा गुण उपहास लोकां ।

दांभिक भक्‍ती तैशी तुम्ही देखा ॥ २ ॥

काजळ कुंकू माथा वेणी ।

नकटी सुंदर म्हणेल कोणी ॥ ३ ॥

नकटीचा संग करी तोचि साजे ।

दांभिक भजनाते देवचि लाजे ॥ ४ ॥

एका जनार्दनी भावेविण ।

कुसराचे भजन ते नकटेपण ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel