क्षत्रिय कुळवंत । श्रीअयोध्याधीश । राजाराम छत्रपती अनंतब्रह्मांडनिवासी राजे । श्रीजिवाजीपंत शेकदार ।

मौजे देहगांव तालुके अष्टपुरी । मामले पांचाळेश्वर । यांसी आज्ञापत्र । मौजे मजकुराचा वाका लिहून कळविला ।

तेथें लिहिलें कीं मनाजीराव देशमुख । हे आसुरी सेना पुंडापाळेगार मिळून गांव मारितात ।

वसाहत होऊं देत नाहींत । ब्रह्मपुरींचा मार्ग चालूं देत नाहींत । असें असल्याकारणें तुम्हांवर सहेबाची मेहेरबानी होऊन ।

मनाजी देशमुख याजला तबीब पोहोंचावयास । सरकारांतून सुभे रवाना झाले । बितपशील कलम ।

आत्मा विवेक । प्रधान स्वानुभव । सैन्याधिपति प्रबोध । सरलष्कर इतरा वैर सनदा देऊन ताबडतोब रवाना केलें आहेत ।

तर हें मौजे मजकुरीं पावतांच । अवघें पुंडपाळेगार ठार मारतील । ब्रह्मपुरीचा मार्ग चालूं लागेल ।

याजकरितां तुम्ही आपली खातरजमा राखून । साहेब कामास रुजूं राहणें । केलेली सेवा तुम्हांस मजुरा आहे ।

तर आपण हुजूर आल्यास । बंदमोक्षांतील इमान दिला जाईल । आपणसह पूर्ण निजानंदीं रंगून साहेब कामास तत्पर असणें ।

एका जनार्दनीं शरण । बहुत काय लिहिणें जाबचिठी ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel