जोहार मायबाप जोहार । मी निर्गुणपुरीचा महार । सांगतों सारासार विचार । तो ऐका की जीं मायबाप ॥ १ ॥

कऊल वर्ष शंभर जिवाजीस दिलें घर । शिवाजी तेथें मामलेदार । अवघा कारभार । जिवाजीचा की० ॥ २ ॥

कउलांत लिहिली बोली । परंतु जिवाजी विसरले चाली । धन्याचे दरबारची शुद्धि नाहीं केली । मग पस्तावले की० ॥ ३ ॥

कऊल भरला परिपूर्ण । यमाजीचें बैसलें धरणें । जिवाजीचें उडालें ठाणें । मग दीनवदनें राहिलें की० ॥ ४ ॥

यमाजीनें धरूनी नेलें । जिवाजी आपआपणा विसरले । धन्याची बाकी विसरले । मागुती जन्मासी आले की० ॥ ५ ॥

ऐसे जन्म लक्ष चौर्‍यांयशी । फेरे जाहले जिवाजीसी । शरण एका जनार्दनाशी । तरीच फेरे चुकती की जी मायबाप ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel