ध्यान धरूं तो देव ना देवी नैवेद्य नहीना बोना । पूजा करूं तो भक्त ना गीती गाऊं तरी निःशब्द रे बाबा ॥ १ ॥

निराश भावूं निराश ध्याऊं शून्यमें शून्य खाऊं रे । घटमटके ज्यांहा बिनाश भैले सो तत्त्व गुरुगम्य पाऊं रे बाबा ॥ २ ॥

दर्शन करूं तो रूप ना रूपा उपचार करूं । तो धूप ना दीपा । चंद्र सुरीज दो मेले सोहं तो आप आपे आपरे बाबा ॥ ३ ॥

फाकट गाऊं फुकट ध्याऊं । नयनबिना निजतेज लखाऊं । क्षुधा खाऊं तृषा पिऊं जीव मारूनि जिवं रे ॥ ४ ॥

अहं सोहं जीव ना भाव कांहा पाप कांहा पुण्य । जनार्दन पुता अभिन्न एका सहजीं सहज निरशून्य रे बाबा ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel