अभयपत्र जिवाजीपंतास । कळावे कीं मौजे देहपूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवूं ।

ऐशी तुम्ही लिहून कळविली । तेणेंकरून धन्यास फार संतोष जाहला ।

जाणोन धन्यानें तुमचे गांवचे आबादी करितां । ज्ञानवैराग्यासह शांति क्षमा दया हे ताबडतोब रवाना केलें ।

मौजे मजकुरी पावतांच यांचा अंगिकार करून वहिवाट सुरू करणें । या कामीं कोणाची हरकत धरूं नये ।

मागाहून स्वधर्मपंताची स्वारी येणार आहे । तुम्ही आपुले हुशारींत राहणें । लिहिलेप्रमाणें वर्तणूक ठेवणें ।

एका जनार्दनीं शरण । हें अभयपत्र दिलें । सही ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel