जोहार मायबाप जोहार । मी सद्‍गुरू साहेबांचा लेकवळा महार । त्याचे दरबारचा झाडाफडीचा कारभार ।

मीच करितोंकी जी मायबाप ॥ १ ॥

सकाळींच उठतों । सारे रयतेची खबर घेतों । येउनी धन्यास सांगतों । तें ऐका की जी मायबाप ॥ २ ॥

रतयेंत कुलबाव जाहला । धन्याचे नांवाचा बोलबाला । गांव आबादींत राहिला । धन्याचे सत्तेनें की० ॥ ३ ॥

त्यांत जिवजीचें आलें ठाणे । गांव बिघडला सर्व तेणें । विसरलें धन्याचें ठाणें । केलें पेणें चौर्‍यांयशीचें की० ॥ ४ ॥

म्हणोनी मारितो हाकां । जिवाजीपंतास हा धक्का । एका जनार्दनाचरणी देखा । करीं विनवणीं की जी मायबाप ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel