शिळा तांब्याचे बाहुलें केलें । पाट मांडूनी वरी बसविलें । वस्त्र अलंकारीं गुंडाळिलें । मना आलें तें नाम ठेविलें ॥ १ ॥

या जनासी लागलें वेड ॥ध्रु०॥

शुद्ध पाण्यानें प्रक्षाळीलें । गंध फुलानें झाकोळिलें । धूप दाऊनि दीपें उजळिलें । पुढें अन्न ठेवूनि चाळविलें ॥ २ ॥

घेरे घेऊनि भोवंडिलें । आडवे पडोनी दंडवत केलें । आपपर नाहीं देखिलें । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel