पाली भाषेत :-

५०१    ये अत्तदीपा विचरन्ति लोके | अकिंचना सब्बधि विप्पमुत्ता |
कालेन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यथेज ||१५||

५०२  ये हेत्थ१(१. सी.- एत्थ.) जानन्ति य़थातथा इदं | अयमन्तिमा नत्थि पुनब्भवो ति |
कालेन तेसु हव्यं पावेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||१६||

५०३    यो वेदगू झानरतो सतीमा२( २ म. – सतिमा.) संबोधिपत्तो सरणं बहुन्नं |
कालेन तम्हि हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||१७||

५०४    अध्दा अमोघा मम पुच्छना अहु | अक्खासि मे भगवा दिक्खिणेय्ये |
त्वं हेत्थ जानासि यथातथा इदं. | तथा हि ते विदितो एस धम्मो ||१८||

मराठीत अनुवाद :-

५०१.  जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे अकिंचन, सर्व प्रकारें विमुक्त, या जगांत स्व:ला द्वीप१ (१ समुद्रांतील बेटाप्रमाणे सु-स्थिर) बनवून राहतात. त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (१५)

५०२.  जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे आपणांस यथार्थतया जाणतात, ‘हा आपला शवटचा जन्म  आहे व आपणांस. पुवर्जन्म नाही’ हें जाणातात, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (१६)

५०३.  जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जो वेदपारग, ध्यानरत, स्मृतिमान्, संबोध-प्राप्त व पुष्कळांना तारणारा, त्याला योग्य वेळीं हव्य द्यावें. (१७)

५०४.     (माघ-) माझें विचारणें सफल झालें. भगवन्तानें दक्षिणार्ह कोण हें मला सांगितलें. हें तूं यथातथ्य जाणतोस; कारण हा धर्म तुला माहित आहे. (१८)

पाली भाषेत :-

५०५  यो याचयोगो दानपति गहट्ठो (इति माघो माणवो) | पुञ्ञऽत्थिको यजति पुञ्ञऽपेक्खो|
ददं परेसं इध अन्नपानं | अक्खाहि मे भगवा यञ्ञसंपदं ||१९||

५०६  यजस्सु  यजमानो (माघा ति भगवा) | सब्बत्थ च विप्पसादेहि चित्तं |
आरम्मणं यजमानस्स यञ्ञं१(१ प. यञ्ञो.) | एत्थ पतिट्ठाय जहाति दोसं ||२०||

५०७ सो२(२. म. –यो.) वीतरागो पविनेय्य३( ३ म. , सी.-विनेय्यं.) दोसं | मेत्तं चित्तं भावयं अप्पमाणं |
रत्तिं-दिवं सततं अप्पमत्तो| सब्बा दिसा फरते अप्पमञ्ञं ||२१||

मराठीत अनुवाद :-

५०५. या जगांत इतरांना अन्नपान देणारा, जो याचकप्रिय, दानपति गृहस्थ – असें माघ माव माणव म्हणाला – पुण्याच्या अपेक्षेनें पुण्यप्राप्तीसाठीं यज्ञ करतो, त्याची, हे भगवन्, यज्ञसंपदा कोणती तें मला सांगा. (१९)

५०६. यजमान होऊन यज्ञ कर – हे माघा, असें भगवान् म्हणाला- सर्वत्र१(१ टीकाकाराच्या मताप्रमाणे ‘सर्वत्र’ म्हणजे सर्वकाळीं – दान देण्यापूर्वी, दान देत असताना व दानानंतर. ५०९ गाथेवरील टीप पहा) चित्त  प्रसन्न ठेव. यज्ञ यजमानाला आलंबनासारखा आहे; ह्यावर स्थित राहून यजमान द्वेष सोडून देतो. (२०)

५०७.  तो वीतराग द्वेष सोडून अप्रमाण मैत्रीची भावना करणारा रात्रंदिवस जागृत राहून सर्व दिशा, अप्रमाण (मैत्री, करूणा, मुद्रिता, उपेक्षा-या.) भावनांनी भरून टाकतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel