पाली भाषेत :-

७०
[१६ मोघराजमाणवपुच्छा (१५)]

१११६ द्वाहं सक्कं १अपुच्छिस्सं( १ सी.-स्स) (इच्चायस्मा मोघराजा) न मे व्याकासि चक्खुमा।
याव ततियं च२(२ म.-व.) देविसि व्याकरोती३( ३ म.-ब्या) ति मे सुतं।।१।।

१११७ अयं लोको परो४(४-४ सी., म.-परलोको.) लोको४ ब्रह्मलोको सदेवको।
दिट्ठि५(५ म.-दिट्ठि.) ते नाभिजानाति६(६ रो.-जानामि.) गोतमस्स यसस्सिनो।।२।।

१११८ ७( ७ सी.-Fsb.-एतं.)एवं अभिक्कन्तदस्साविं अत्थि पञ्हेन आगमं।
कथं लोकं अवेक्खन्तं मच्चुराजा न पस्सति८।।३।।

मराठीत अनुवाद :-

७०
[१६ मोघराजमाणवपुच्छा (१५)]

१११६ मीं शाक्याला (बुद्धाला) दोनदां प्रश्न विचारला - असें आयुष्मान् मोघराजा म्हणाला —पण त्या चक्षुष्मन्तानें मला उत्तर दिलें नाहीं. तिसर्‍यांदा प्रश्न विचारला असतां तो देवर्षिं उत्तर देत असतो असें मी ऐकलें आहे. (१)

१११७ हा लोक, परलोक, आणि सदेवक ब्रह्मलोक तुझी, यशस्वी गोतमाची, (सांप्रदायिक) दृष्टी कशा प्रकारची आहे हें जाणत नाहीं. (२)

१११८ अशा प्रकारें उच्च दर्जाची ज्याची दृष्टी, त्याजपाशीं मी हा प्रश्न विचारण्याच्या इच्छेनें आलों आहें — ‘जगाकडे कोणत्या रीतीनें पाहिलें असतां त्या माणसाकडे मृत्युराजा पाहत नसतो?’ (३)

पाली भाषेत :-

१११९ सुञ्ञतो लोकं अवेक्खस्सु मोघराज१( १ सी., म., Fsb. - राजा. ) सदा सतो।
अत्तानुदिट्ठिं ऊहच्च२( २म. - उहञ्च. ) एवं मच्चुतरो सिया।
एवं लोकं अवेक्खन्तं मच्चुराजा न पस्सती ति।।४।।

मोघराजमाणवपुच्छा निट्ठिता ।

मराठीत अनुवाद :-

१११९ (भगवान्) हे मोघराजा, सदोदित स्मृतिमान् होऊन जग शून्य आहे हें अवलोकन कर, आणि आत्मदृष्टि सोडून दे; येणें करून मृत्यूच्या पलीकडे जाणारा हो. अशा रीतीनें जो जगाकडे पाहतो त्याजकडे मृत्युराजा पाहत नसतो. (४)

मोघराजमाणवपुच्छा समाप्त

७१
[१७ पिंगियमाणवपुच्छा (१६)]

पाली भाषेत :-


११२० जिण्णोऽहमस्मि अबलो वीतवण्णो (इच्चायस्मा पिंगियो)।
नेत्ता न सुद्धा सवनं न फासु। माऽहं नस्सं मोमुहो अन्तराय३। (३ म. - रायं.)
आचिक्ख धम्मं यमहं विजञ्ञं। जातिजराय४( ४ Fsb. जाति  ) इध विप्पहानं।।१।।

७१
[१७ पिंगियमाणवपुच्छा (१६)]


११२० मी जीर्ण, अबल आणि वीतवर्ण आहें — असें आयुष्मान् पिंगिय म्हणाला — माझे डोळे साफ नाहींत; कानांना ऐकण्यास कठिण पडतें. तेव्हां मोहबद्ध होऊन मध्येंच माझा अन्त न व्हावा, म्हणून मला समजेल अशा रीतीनें जन्मजरेचा नाश करणारा धर्म सांग(१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel