पाली भाषेतः-

६१३ यो हि कोचि मनुस्सेसु पुथु सिप्पेन जीवति।
एवं वासेट्ठ जानाहि सिप्पिको सो न ब्राह्मणो।।२०।।

६१४ यो हि कोचि मनुस्सेसु वोहारं उपजीवति।
एवं वासेट्ठ जानाहि वाणिजो सो न ब्राह्मणो।।२१।।

६१५ यो हि कोचि मनुस्सेसु परपेस्सेन१(१ म.-परपेसेन.) जीवति।
एवं वासेट्ठ जानाहि पेस्सिको२(२ म.-पेस्सको.) सो न ब्राह्मणो।।२२।।

६१६ यो हि कोचि मनुस्सेसु अदिन्नं उपजीवति।
एवं वासेट्ठ जानाहि चोरो एसो न ब्राह्मणो।।२३।।

६१७ यो हि कोचि मनुस्सेसु इस्सत्थं उपजीवति।
एवं वासेट्ठ जानाहि योधाजीवो न ब्राह्मणो।।२४।।

६१८ यो हि कोचि मनुस्सेसु पोरोहिच्चेव जीवति।
एवं वासेट्ठ जानाहि याजको सो न ब्राह्मणो।।२५।।

मराठी अनुवादः-

६१३. मनुष्यांत जो कोणी भिन्न भिन्न कारागिरीनें उपजीविका करतो तो, हे वासेष्ठा, कारागीर आहे, ब्राह्मण नव्हे, असें समज.(२०)

६१४. मनुष्यांत जो कोणी व्यापारावर उपजीविका करतो तो, हे वासेष्ठा, वाणी आहे, ब्राह्मण नव्हे, असें समज.(२१)

६१५. मनुष्यांत जो कोणी शिपायाचें काम करतो तो, हे वासेष्ठा, शिपाई आहे, ब्राह्मण नव्हे, असें समज.(२२)

६१६. मनुष्यांत जो कोणी चोरीवर उपजीविका करतो तो, हे वासेष्ठा, चोर आहे, ब्राह्मण नव्हे, असें समज.(२३)

६१७. मनुष्यांत जो कोणी धनुर्विद्येवर उपजीविका करतो तो, हे वासेष्ठा, योद्धा आहे, ब्राह्मण नव्हे, असें समज.(२४)

६१८. मनुष्यांत जो कोणी पुरोहितपणावर उपजीविका करतो तो, हे वासेष्ठा, याचक आहे, ब्राह्मण नव्हे, असें समज.(२५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel