पाली भाषेत :-

१०३५ यानि सोतानि लोकस्मिं (अजिता ति भगवा) सति तेसं निवारण।
सोतानं संवरं ब्रूमि पञ्ञायेते पिथिय्यरे।।४।।

१०३६ पञ्ञा चेव सती(१म.-सति.)१ च२(२म.-यं च, नि.-चापि.) (इच्चायस्मा अजितो) नामरूपं च मारिस। 
एतं३ मे पुट्ठो पब्रूहि कत्थेतं उपरुज्झति।।५।। (३म.-एवं, नि.-एतं.)

१०३७ यं एतं पञ्हं अपुच्छि अजित तं वदामि ते।
यत्थ नामं च रूपं च असेसं उपरुज्झति।
विञ्ञाणस्स निरोधेन एत्थेतं उपरुज्झति।।६।।

१०३८ ये च ४(४नि., अ.-संखातधम्मासे.)संखतधम्मासे ये च सेखा पुथू इध।
तेसं मे निपको इरियं पुट्ठो पब्रूहि मारिस।।७।।

मराठीत अनुवाद :-

१०३५ जगांत जे प्रवाह आहेत — हे अजिता, असें भगवान् म्हणाला — त्याचें निवारण स्मृति होय. तीच प्रवाहांचें नियमन असें मी म्हणतों व प्रज्ञेमुळें ते बंद होतात. (४)

१०३६ हे मारिषा, प्रज्ञा आणि स्मृति — असें आयुष्मान् अजित म्हणाला — आणि नामरूप यांचा निरोध कोठें होतो हें मी विचारतों, तें मला सांग. (५)

१०३७ हे अजिता, हा जो तूं प्रश्न विचारलास, त्याचें मी तुला उत्तर देतों; जेथें नाम आणि रूप पूर्णपणें निरोध पावतात, तें मी तुला सांगतों - विज्ञानाच्या निरोधानें यांचा निरोध होतो. (६)

१०३८ इहलोकीं जे अनेक सर्व धर्मांचें (वस्तूंचें) यथार्थ ज्ञान असलेले असे (अर्हन्त) आणि शैक्ष्य आहेत, त्यांमध्यें तूं कुशल आहेस; तेव्हां त्याची वागणूक कशी असते हें मी तुला विचारतों तें, हे मारिषा, मला सांग. (७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to सुत्तनिपात


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
श्यामची आई
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
अजरामर कथा
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
शिवाजी सावंत
रत्नमहाल