पाली भाषेत :-

[४. अट्ठकवग्गो]
३९
[१. कामसुत्तं]


७६६ कामं कामयमानस्स१(१ रो., नि.-कामयानस्स.) तस्स चेतं समिज्झति।
अद्धा पीतिमनो होति लद्धा मच्चो यदिच्छति।।१।।

७६७ तस्स ते कामयमानस्स१ छन्दजातस्स जन्तुनो।
ते कामा परिहायन्ति सल्लविद्धो व रुप्पति।।२।।

७६८ यो कामे परिवज्जेति सप्पस्सेव पदा सिरो।
सो २इमं(२ म., नि.-सो मं.) विसत्तिकं लोके सतो समतिवत्तति।।३।।

मराठीत अनुवाद :-

[अट्ठकवग्ग, चौथा]
३९
[१. कामसुत्त]


७६६. कामोपभोगांची इच्छा करणार्‍याचे बेत तडीस गेले, तर जें इच्छितो तें मिळाल्यामुळें तो मर्त्य खात्रीनें आनंदित होतो.(१)

७६७ पण इच्छा करणार्‍या व आसक्त झालेल्या त्या प्राण्याचे जर ते कामोपभोग नष्ट झाले, तर तो बाणानें विद्ध झाल्याप्रमाणें दु:ख पावतो.(२)

७६८ सर्पाच्या डोक्यापासून आपलें पाऊल दूर ठेवावें, तद्वत् जो कामोपभोगापासून दूर राहतो, तो स्मृतिमान् या विषक्तिकेला (तृष्णेला) मागें टाकून जातो.(३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel