पाली भाषेत :-

१४९ माता यथा नियं पुत्तं आयुसा एकपुत्तमनुरक्खे।
एवंऽपि सब्बभूतेसु मानसं भावये अपरिमाणं।।७।।

१५० मेत्तं च सब्बलोकस्मिं मानसं भावये अपरिमाणं।
उद्धं अधो च तिरियं च असंबाधं अवेरं असपत्तं।।८।।

१५१ तिट्ठ चरं निसिन्नो वा सयानो वा यावतस्स विगतमिद्धो।
एतं सतिं अट्ठिधेय्य ब्रह्ममेतं विहारं इदमाहु।।९।।

१५२ दिट्ठिं च अनुपगम्म सीलवा दस्सनेन संपन्नो।
कामेसु विनेय्य१ गेधं न हि जातु गब्भसेय्यं पुनरेती ति।।१०।।

मेत्तसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

१४९. आई जशी एकुलत्या एक औरस पुत्राचें आपलें आयुष्य खर्चूनही रक्षण करते, त्याचप्रमाणें सर्व प्राण्याविषयीं अमर्याद प्रेम बाळगावें. (७)

१५०. आणि सर्व लोकांविषयीं वर, खाली आणि चोहोंकडे, असंबाध, अवैर आणि असपत्‍न मैत्रीची अमर्याद भावना वाढवावी. (८)

१५१. उभा असतां, चालत असतां, बसला असतां, अथवा अंथरुणांत असतां, जोंपर्यंत निद्रा आली नाहीं तोंपर्यंत ही (मैत्री-भावनेची) स्मृति कायम ठेवावी. हिलाच इहलोकीं ब्राह्मजीवन म्हणतात. (९)

१५२. मिथ्यादृष्टीचा अवलंब न करतां, शीलवान् आणि ज्ञानसंपन्न होऊन आणि विषयाचा लोभ सोडून दिल्यानें तो खात्रीनें पुनरपि गर्भवासाला येत नाहीं. (१०)

मेत्तसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel