पाली भाषेत :-

११२१ दिस्वान रूपेसु विहञ्ञमाने (पिंगिया ति भगवा) रुप्पन्ति रूपेसु जना पमत्ता।
तस्मा तुवं पिंगिय अप्पमत्तो। जहस्सु रूपं अपुनब्भवाय।।२।।

११२२ दिसा चतस्सो विदिसा चतस्सो। उद्धं अधो दस दिसता१(१ म., नि., Fsb.- दिसा.) इमायो।
न तुय्हं२(२ सी.- तुय्ह.) अदिट्ठं असुतं३( ३ म., नि., सी.-असुतं, अमुतं Fsb.- असुतामुतं वा.) - मुतं वा।
अथो अविञ्ञातं४( ४ सी. ऽविञ्ञातं.)( ५ Fsb. किञ्चनं., नि.-किञ्चि नत्थि. म.-किञ्चिनं, किचिनं.)किञ्चनमत्थिलोके
आचिक्ख धम्मं यमहं विजञ्ञं। जातिजराय इध विप्पहानं।।३।।

११२३ तण्हाधिपन्ने मनुजे पेक्खमानो (पिंगिया ति भगवा)। सन्तापजाते जरसा परेते।
तस्मा तुवं पिंगिय अप्पमत्तो। जहस्सु तण्हं अपुनब्भवाया ति।।४।।

पिंगियमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-


११२१ स्व-रूपांत लोक प्रमत्त होऊन - हे पिंगिया असें भगवान् म्हणाला - दु:ख भोगतात आणि आघात पावतात, हें पाहून, हे पिंगिया, पुनर्जन्म न व्हावा एतदर्थ अप्रमत्त होऊन तूं रूपाचा त्याग कर. (२)

११२२ (पिंगिय-) (हे भगवन्), चार दिशा, चार विदिशा, वर आणि खालीं, या दहाही दिशांत अदृष्ट, अश्रुत, अननुमित आणि अविज्ञात असें या जगांत तुला कांहीं नाहीं. म्हणून, मला समजेल अशा रीतीनें, जन्मजरेचा नाश करणारा धर्म कोणता, तें सांग. (३)

११२३ तृष्णेंत बद्ध झालेल्या - हे पिंगिया, असें भगवान् म्हणाला — आणि त्यामुळें संताप पावणार्‍या व जरेनें ग्रस्त अशा माणसांकडे पहा, आणि म्हणून, हे पिंगिया, पुनर्जन्म न व्हावा एतदर्थ अप्रमत्त होऊन तूं तृष्णेचा त्याग कर. (४)

पिंगियमाणवपुच्छा समाप्त

पाली भाषेत :-

७२
[१८. पारायणसुत्तं]


इमदवोच भगवा मगधेसु विहरन्तो पासाणके चेतिये। परि१चारकसोळसानं (१ सी, Fsb.-वारक.) ब्राह्मणानं अज्झिट्ठो पुट्ठो पुट्ठो पञ्हे२ (२ म.-पञ्हं.) ब्याकासि। एकमेकस्स चेऽपि पञ्हस्स अत्थं अञ्ञाय धम्मं अञ्ञाय धम्मानुधम्मं पटिपज्जेय्य, गच्छेय्येव जरामरणस्स पारं। पारंगमनीया इमे धम्मा ति। तस्मा इमस्स धम्मपरियायस्स पारायणं त्वेव अधिवचनं।

११२४ अजितो तिस्समेत्तेय्यो पुण्णको अथ मेत्तगू।
धोतको उपसीवो च नन्दो च अथ हेमको।।१।।

मराठीत अनुवाद :-

७२
[१८. पारायणसुत्त]


मगध देशांत पाषाणक चैत्य येथें राहत असतां भगवान् असें बोलता झाला. (बावरीच्या) सोळा ब्राह्मण शिष्यांनीं आपल्या प्रश्नांची उत्तरें देण्यास विनंति केली, तेव्हां भगवंतानें त्यांच्या प्रश्नांचीं (यथायोग्य) उत्तरें दिलीं. यांपैकीं एकादेंही उत्तर व त्याचा अर्थ जाणून, जो तदनुसार वागेल, तो जरामरणाच्या पार जाईल. हा उपदेश संसाराच्या पार नेणारा म्हणून या धर्मोपदेशाचें ‘पारायण’ असेंच नांव आहे.

११२४ अजित, तिस्समेत्तेय्य, पुण्णक, मेत्तगू, धोतक, उपसीव, नंद आणि हेमक, (१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel