पाली भाषेतः-

७५४ ये च रूपूपगा सत्ता ये च आरुप्पवासिनो१।(१ म.-आरुप्पट्ठायिनो.)
निरोधं अप्पजानन्ता आगन्तारो पुनब्भवं।।३१।।

७५५ ये च रूपे परिञ्ञाय अरूपेसु असण्ठिता।
निरोधे ये विमुच्चन्ति ते जना मच्चुहायिनो ति।।३२।।

सिया अञ्ञेन पि...पे.. कथं च सिया। यं भिक्खवे सदेव कस्स लोकस्स समारकस्स सस्समणब्राह्मणिया पजाय सदेवमनुस्साय इदं सच्चं ति उपनिज्झायितं, तदमरियानं एतं मुसा ति सम्मप्पञ्ञाय सुद्दिट्ठं-अयं एकानुपस्सना; यं भिक्खवे सदेवकस्स....पे....सदेवमनुस्साय इदं मुसा ति उपनिज्झायितं तदमरियानं एतं सच्चं ति यथाभूत सम्मप्पञ्ञाय सुद्दिट्ठं-अयं दुतियानुपस्सना। एवं सम्मा... पे....अथापरं एतदवोच स्तथा—

मराठी अनुवादः-

७५४ जे रूपावचर-देव व अरूपावचर-देव आहेत, ते निरोध जाणत नाहींत म्हणून पुनर्जन्म पावतात. (३१)

७५५ पण जे रूपावचर-देवलोक जाणून व अरूपावचर-देव-लोकाविषयीं अनासक्त होऊन निरोधांत मुक्ति पावतात, ते जन मृत्यूला सोडून जातात.(३२)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? भिक्षूंनो, सदेवक समारक लोकांत सश्रमण ब्राह्मणी आणि सदेवमनुष्य प्रजेंत जें सत्य समजलें जातें तें खोटें आहे असें सम्यक्-प्रज्ञेनें यथार्थतया उत्तम रीतीनें पाहतात, ही एक अनुपश्यना; आणि भिक्षूंनो, सदेवक .....इत्यादी....सदेवमनुष्य प्रजेंत जे खोटें समजलें जातें ते खरें आहे असें आर्य सम्यक्-प्रज्ञेनें यथार्थतया उत्तम रीतीनें पाहतात, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें.... इत्यादी....तो सुगत शास्ता म्हणाला—

पाली भाषेतः-


७५६ अनत्तनि अत्तमानं पस्स लोकं सदेवकं।
निविट्ठं नामरूपस्मिं इदं सच्चं ति मञ्ञति।।३३।।

७५७ येन येन हि मञ्ञन्ति ततो तं होति अञ्ञथा।
तं हि तस्स मुसा होति मोसधम्मं हि इत्तरं।।३४।।

७५८ अमोसधम्मं निब्बाणं तदरिया सच्चतो विदू।
ते वे सच्चाभिसमया निच्छाता परिनिब्बुता ति।।३५।।

सिया अञ्ञेन पि परियायेन सम्माद्वयतानुपस्सना ति इति चे भिक्खवे पुच्छितारो अस्सु, सिया तिऽस्सु वचनीया। कथं च सिया। यं भिक्खवे सदेवकस्स....पे....सदेवमनुस्साय इदं सुखं ति उपनिज्झायितं, तदमरियानं एतं दुक्खं ति यथाभूतं सम्मप्पञ्ञाय सुद्दिट्ठं-अयं एकानुपस्सना; यं भिक्खवे सदेवकस्स....पे....सदेवमनुस्साय इदं दुक्खं ति उपनिज्झायितं, तदमरियानं एतं सुखं ति यथाभूतं सम्मप्पञ्ञाय सुद्दिट्ठं-अयं दुतियानुपस्सना। एवं सम्माद्वयतानुपस्सिनो खो भिक्खवे भिक्खुनो अप्पमत्तस्स आतापिनो पहितत्तस्स विहरतो द्विन्नं फलानं अञ्ञतरं फलं पाटिकंखं-दिट्ठे व धम्मे अञ्ञा, सति वा उपादिसेसे अनागामिता ति। इदमवोच भगवा, इदं वत्वा सुगतो अथापर एतदवोच सत्था—

७५९ रूपा सद्दा रसा गंन्धा फस्सा धम्मा च केवला।
इट्ठा कन्ता मनापा च यावतत्थीति वुच्चति।।३६।।

मराठी अनुवादः-

७५६ अनात्म्यांत आत्मा आहे असें मानणार्‍या व नामरूपांत बद्ध झालेल्या सदेवक लोकांकडे पहा. ते हेंच सत्य आहे असें समजतात. (३३)

७५७ ज्या ज्या रीतीनें ते कल्पना करतात, त्याहून ती वस्तु निराळीच असते, आणि त्यांचीं कल्पना खोटी ठरते. कारण जें क्षणभंगुर तें नश्वर असतें.(३४)

७५८ पण निर्वाण अनश्वर आहे आणि आर्य ‘तें सत्य आहे’ असें जाणतात आणि त्या सत्याच्या ज्ञानानें निस्तृष्ण होऊन ते निर्वाण पावतात.(३५)

दुसर्‍याही प्रकारानें सम्यक्-द्वैतानुपश्यना असेल काय असें जर भिक्षूंनो, तुम्हांस कोणी विचारणारे भेटतील, तर अशी असेल असें त्यांस म्हणावें. ती कशी? भिक्षूंनो, सदेवक....इत्यादी...सदेवकमनुष्य प्रजेंत जें सुख समजलें जातें तें दु:ख आहे, असें आर्य सम्यक्-प्रज्ञेनें यथार्थतया उत्तम रीतीनें पाहतात, ही एक अनुपश्यना; आणि भिक्षूंनो, सदेवक....इत्यादी...सदेवकमनुष्य प्रजेंत जें दु:ख समजलें जातें तें सुख आहे, असें आर्य सम्यक्-प्रज्ञेनें यथार्थतया उत्तम रीतीनें पाहतात, ही दुसरी अनुपश्यना; भिक्षूंनो, याप्रमाणें द्वैताची सम्यक्-अनुपश्यना करणार्‍या, अप्रमत, उत्साही व दृढचित्त होऊन वागणार्‍या भिक्षूला याच जन्मीं अर्हत्त्व किंवा, उपादानशेष राहिल्यास, अनागामिता-या दोहोंपैकी एक फळ मिळण्याची अपेक्षा करतां येईल. असें भगवान् म्हणाला. असें म्हणून तदनंतर तो सुगत शास्ता म्हणाला—

७५९ रूप, शब्द, रस, गन्ध, स्पर्श आणि १धर्म (१ टिकाकर ह्या शब्दासह सहा आलम्बनांचा निर्देश करतो.) म्हणून जे सगळे आहेत त्यांना इष्ट, कान्त आणि मनोहर समजतात.(३६)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel