पाली भाषेत :-

४३९ एसा नमुचि ते सेना कण्हस्साभिप्पहारिणी१(१ रो.-हारणी.)
न तं असूरो जिनाति जेत्वा च लभते सुखं।।१५।।

४४० एस मुञ्ञं परिहरे धिरत्थु इध जीवितं।
संगामे मे मतं सेय्यो यं चे जीवे पराजितो।।१६।।

४४१ पगाळ्हा एत्थ न दिस्सन्ति एके समणब्राह्मणा।
तं च मग्गं न जानन्ति येन गच्छन्ति सुब्बता।।१७।।

४४२ समन्ता धजिनिं दिस्वा युत्तं मारं सवाहनं।
युद्धाय पुट्टुग्गच्छामि मा मं ठाना अचावयि।।१८।।

मराठीत अनुवाद :-

४३९. हे मनुचि, तुझी कृष्णाची ही इतरांवर प्रहार करणारी सेना होय. तिला दुबळा माणूस जिंकू शकत नाहीं. पण (जो शूर) तिला जिंकतो, तो सुख लाभतो.(१५)

४४०. हा मी मुंज-तृण (मस्तकीं)१ (१ लढाईस जातांना शूर योद्धे डोक्यावर, तरवारीस किंवा झेंड्यास मुंज नावाचें गवत बांधीत असत. त्याचा अर्थ इतकाच कीं, आम्हीं लढाईत मरूं, पण पराजय पावून मागें फिरणार नाहीं.) धारण करतो. (तुझ्या सेनेकडून पराभूत झाल्यास) माझ्या जीविताचा धिक्कार असो! पराजय पावून जगण्यापेक्षां संग्रामांत मला मरण आलेलें चांगलें!(१६)

४४१. कित्येक श्रमण-ब्राह्मण या तुझ्या सैन्यांत निगग्न झाल्याकारणानें प्रकाशित होत नाहींत, आणि सुव्रत ज्या मार्गानें जातात, तो मार्ग ते जाणत नाहींत.(१७)

४४२. आसमंतात् लढाईला सिध्द झालेल्या मारसेनेला आणि वाहनारूढ माराला पाहून, त्यानें मला स्थानभ्रष्ट करूं नये म्हणून मी युध्दाला पुढें सरसावतों.(१८)

पाली भाषेत :-

४४३ यं ते तं नप्पसहति सेनं लोको सदेवको।
तं ते पञ्ञाय गच्छामि आमं पत्तं व अस्मना १(१ रो.-अम्हना.)।।१९।।

४४४ वसिं कत्वान संकप्पं सतिं च सुप्पतिट्ठितं।
रट्ठा रट्ठं विचरुस्सं सावके विनयं पुथु।।२०।।

४४५ ते अप्पमत्ता पहितऽत्ता मम सासनकारका।
अकामस्स ते गमिस्सन्ति यत्थ गन्त्वा न सोचरे।।२१।।

४४६ सत्त वस्सानि२(२म.-सत्तवस्सं.) भगवन्तं अनुबन्धिं पदापदं।
ओतारं नाधिगच्छिस्सं सम्बुद्धत्स सतीमतो।।२२।।

४४७ मेदवण्णं व पासाणं वायसो अनुपरियगा३(३म.-अनुपरीयगा.)
अपेत्थ मुदु विन्देम अपि अस्सादना सिया।।२३।।

मराठीत अनुवाद :-

४४३. ज्या तुझ्या सेनेसमोर देव आणि मनुष्यें टिकत नाहींत तिचा, कच्चें मातीचें भांडें दगडानें फोडावें त्याप्रमाणें, प्रज्ञेनें मी विध्वंस करतों.(१९)

४४४. माझे संकल्प स्वाधीन ठेवून, स्मृति सुस्थित करून, अनेक श्रावकांना उपदेश देत मी देशोदेशीं फिरत राहीन.(२०)

४४५. ते अप्रमत्त, दृढचित्त होऊन माझ्या उपदेशाप्रमाणें वागणारे, तुझ्या इच्छेविरुध्द, अशा स्थानीं जातील कीं, जेथें जाऊन ते शोक करीत बसणार नाहींत.(२१)

४४६. (मार-) “भगवंताच्या मागोमाग सात वर्षें सारखा फिरत राहिलो; पण या स्मृतिमान् संबुद्धाचें छिद्र मला सांपडलें नाहीं.(२२)

४४७. ‘येथें कांहीं मृदु(मांस) असेल व आस्वाद असेल,’ अशा समजुतीनें कावळा मेदवर्ण पाषाणाजवळ आला.(२३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel