पाली भाषेतः-

८०१ यस्सूभयन्ते१(१ सी.-यस्सुभन्ते.) पणिधीध नत्थि। भवाभवाय इध वा हुरं वा।
निवेसना तस्स२(२ म.-यस्स) न सन्ति केचि। धम्मेसु निच्छेय्य समुग्गहीता३।।६।।(३ म.-हीतं.)

८०२ तस्सीघ४(४ य.-तस्स यिध.) दिट्ठे व५(५ म-वा.) सुते मुते वा। पकपिता नत्थि अणूऽपि६(६ म.-अणु.) सञ्ञा।
तं ब्राह्मणं७ दिट्ठिमनादियानं७(७-७ सी.-ब्राह्मणा दिट्ठिमनादियाना.)। केनीध८(८ सी.-को नीध.) लोकास्मिं९ विकप्पयेय्य।।७।।

८०३ न कप्पयन्ति न पुरेक्खरोन्ति१०(१० म.-पुरक्ख.)। धम्माऽपि तेसं न पटिच्छितासे११।(११ सी., Fsb.- पनिच्छितासे.)
न ब्राह्मणो सीलवतेन नेय्यो। पारं गतो न पच्चेति तादी ति।।८।।

परमट्ठकसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

८०१ इहलोकीं किंवा परलोकीं भव आणि अभव या दोनही टोकांविषयी ज्याला उत्कंठा नाहीं, त्याला सर्व गोष्टींचा विचार करून दृढपणें स्वीकारलेले कोणतेही संप्रदाय नाहींत.(६)

८०२ दृष्ट, श्रुत, आणि अनुमित यांविषयीं विकल्पिलेली अशी कोणतीही अणुमात्र संज्ञा त्याला नाहीं. कोणतीहि दृष्टि पकडून न बसणार्‍या त्या ब्राह्मणाला या जगांत कोणचा व कसला विकल्प असूं शकेल? (७)

८०३ ते विकल्पांत पडत नाहींत, एकाद्या गोष्टीचा पुरस्कार करीत नाहींत आणि कोणतीही सांप्रदायिकता स्वीकारीत नाहींत. शीलव्रतानें ब्राह्मणाला पकडीत धरून खेचतां येत नाहीं. तो  पार गेलेला पुन: परत येत नाहीं.(८)

परमट्ठकसुत्त समाप्त

पाली भाषेत :-

४४
[६. जरासुत्तं]


८०४ अप्पं वत जीवितं इदं। ओरं वस्सताऽपि मिय्यति।
थो१(१ म.-सा.) चे२ऽपि(२ सी.-मे.) अतिच्च जीवति। अथ खो सो जरसाऽपि मिय्यति।।१।।

८०५ सोचन्ति जना ममायिते। न३(३-३म.-न हिंसन्ति निच्चा, Fsb. न हि सन्तानिच्चा.) हि सन्ति निच्चा परिग्गहा।
विनाभावसन्तमेविदं। इति दिस्वा नागारमावसे।।२।।

८०६ मरणेनऽपि न पहीयति४(४. सी., म.-पहिय्यति.)। यं पुरिसो मम यिदं५(५-५म.-ममयं, ममायं, मय्हं.) ति मञ्ञति।
६एवंऽपि(६ म. नि.-एतं.) विदित्वा पण्डितो। न ममत्ताय७ (७ म., Fsb.-पमत्ताय.) नमेथ८ मामको।।३।।(८ म.-नमेय.)

मराठी अनुवादः-

४४
[६. जरासुत्त]


८०४ अहा! हें जीवित किती अल्प आहे. मनुष्य शंभर वर्षांपूर्वीही मरतो, आणि त्याहून जास्त जगला तर तो जरेनेंच मेल्यासारखा असतो.(१)

८०५ ममत्वामुळें लोक शोक करतात; पण परिग्रह नित्य नव्हेत. हें अस्तित्वांत असलेलें जग नश्वरधर्म असें जाणून अनागारिक होऊन रहावें.(२)

८०६ मनुष्य ज्याला ‘हें माझें’ असें समजतो, तें मरणानेंहि नष्ट होतें, असें जाणून माझ्या शहाण्या अनुयायानें ममत्वाकडे (मन) झुकूं देऊं नये.(३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel