पाली भाषेत :-

१३८ सो यसं परमं पत्तो मातंगो यं सुदुल्लभं।
आगच्छुं तस्सुपट्ठानं खत्तिया ब्राह्मणा बहू।।२३।।

१३९ सो देवयानमारुय्ह विरजं सो महापथं२ ।
कामरागं विराजेत्वा ब्रह्मलोकूपगो अहु।
नं नं जाति निवारेसि ब्रह्मलोकूपपत्तिया।।२४।।

१४० अज्झायककुले जाता१ (१ अ.- ‘अज्झायका कुले जाता’ ति पि पाठो.) ब्राह्मणा मन्तबन्धुनो।
ते च पापेसु कम्मेसु अभिण्हमुपदिस्सरे।।२५।।

१४१ दिट्ठे व धम्मे गारय्हा संपराये च दुग्गतिं
न ते जाति निवारेति दुग्गच्चा गरहाय वा।।२६।।

१४२ न जच्चा वसलो होति न जच्चा होति ब्राह्मणो।
कम्मुना वसलो होति कम्मुना होती ब्राह्मणो ति।।२७।।
एवं वुत्ते अग्गिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं एतदवोच- अभिक्कन्तं भो गोतम...पे.... धम्मं च भिक्खुसंघं च। उपासकं मं भवं गोतमो धारेतु अज्जतग्गे पाणुपेतं सरणं गतं ति।

वसलसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

१३८. त्या मातंगाला अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत दुर्लभ यश मिळालें. त्याच्या सेवेला पुष्कळ क्षत्रिय आणि ब्राह्मण हजर असत. (२३)

१३९. निष्पाप व श्रेष्ठपथवर्तीं देवयानांत बसून व विषय-वासनेचा क्षय करून तो ब्रह्मलोकास गेला. ब्रह्मलोकीं जन्मण्याला त्याला त्याची जात आड आली नाही. (२४)

१४०. स्वाध्याय-संपन्न कुळांत झालेले नामधारी वैदिक ब्राह्मण पुष्कळदां पापकर्मे आचरीत असलेले दिसून येतात. (२५)

१४१. ते इहलोकीं निन्द्य होतात व परलोकीं दुर्गतीला जातात. त्यांचा जन्म दुर्गतीपासून किंवा निन्देपासून त्यांचें रक्षण करीत नाहीं. (२६)

१४२. (म्हणून) जन्मानें वृषल होत नाहीं व जन्मानें ब्राह्मण होत नाहीं. कर्मानें वृषल होतो व कर्मानें ब्राह्मण होतो. (२७)

असें बोलल्यावर आग्निक-भारद्वाज ब्राह्मण भगवन्ताला म्हणाला “धन्य धन्य, भो गोतमा, (इत्यादि)... भिक्षुसंघाला शरण जातों (येथपर्यंत)१. [१. ‘कसि-भारद्वाज’ (अनु. ४) सुत्ताच्या शेवटीं पहा.] आजपासून आमरण शरण गेलेला आहे, असें भगवान् गोतमानें समजावें.”

वसलसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel