पाली भाषेत  :-

२४ अ१ (१ म.-मटो.)त्तवेतनभतोऽहमस्मि (इति धनियो गोपो)
पुत्ता च२ (२-२ म.-चेमे.) मे३(३ अ.-भटको.) समानिया अरोगा।
तेसं न सुणामि किंचि पापं
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।७।।

२५ नाहं भ४ (४ म.-भटिया;) तकोऽस्मि कस्सचि (इति भगवा)
निब्बिट्ठेन चरामि सब्बलोके।
अत्थो भतिया५ (अ.-भटिया ति पि.) न विज्जति
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।८।।

मराठीत अनुवाद :-

२४. “मी स्वत:च्या श्रमानें निर्वाह करतों”-असें धनिय गोप म्हणाला,-“आणि माझे पुत्र माझ्या बरोबर आहेत व निरोगी आहेत, त्यांच्यांत कोणतेंही वाईट असल्याचें माझें ऐकिवांत नाहीं, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (७)

२५. “मी कोणाचा नोकर नाहीं”-असें भगवान् म्हणाला, “मी माझ्या भांडवलावर राहत आहें, नोकरीची मला गरज नाहीं, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (८)

पाली भाषेत  :-

२६ अत्थि वसा अत्थि धेनुपा (इति धनियो गोपो)
गोंधरणियो पवेणियोऽपि१ (१. म.-पवेनियो.) अत्थि।
उसभोऽपि गवंपती२ (२. म.-त) च अत्थि
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।९।।

२७ नत्थि वसा नत्थि धेनुपा (इति भगवा)
गोधरणियो पवेणियोऽपि नत्थि।
असभोऽपि गवंपतीध३ (३ म.-ति च.) नत्थि
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।१०।।

२८ खीला४ (४ सी.-खिळा, म.-खिला.) निखाता असंपवेधी (इति धनियो गोपो)
दामा मुंजमया नवा सुसंठाना।
न हि सक्खिन्ति१ (१ म.-सक्खिस्सन्ति.) धेनुपाऽपि छेत्तुं
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।११।।

मराठीत अनुवाद :-

२६. “मजपाशीं गाई१ (१ पण अ.-दमन न करतां वाढलेलीं वासरें.) व दूध पिणारीं वासरें आहेत”-असें धनिय गोप म्हणाला,-“गाभण्या व फळणार्‍या गाई आहेत, आणि गाईंचा पुढारी बैल आहे, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (९)

२७. “मजपाशीं गाई१ (१ पण अ.-दमन न करतां वाढलेलीं वासरें.) व दूध पिणारीं वासरें नाहींत”-असें भगवान् म्हणाला,-“गाभण्या व फळणार्‍या गाई नाहींत, आणि गाईंचा पुढारी बैल नाहीं, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (१०)

२८. “खुंट चांगले गाडले आहेत, ते हालत नाहींत”- असें धनिय गोप म्हणाला,-“दावीं मुंज गवताचीं असून उत्तम बनविलीं आहेत व नवीं आहेत, दूध पिणार्‍या वासरांना देखील तीं तोडतां येणार नाहींत, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (११)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to सुत्तनिपात


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
श्यामची आई
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
अजरामर कथा
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
शिवाजी सावंत
रत्नमहाल