नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स
सुत्तनिपातो।

[१. उरगवग्गो ]

[ १. उरगसुत्त ]


१  यो१ (१ सी.- यो वे.) उप्पतितं विनेति कोधं विसतं२ (२-म.-विसटं.) सप्पविसं व ओसधेहि।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं।।१।।

त्या भगवान् अर्हत् सम्यक्-संबुद्ध [गोतमाला] नमस्कार असो.

सुत्तनिपात
[उरगवग्ग, पहिला]

[१. उरगसुत्त]


१. पसरत जाणार्‍या सर्पाच्या विषाचा ज्याप्रमाणें औषधांनी नाश करावा, त्याप्रमाणें एकाएकीं उत्पन्न होणार्‍या क्रोधाचा जो नाश करतो तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (१)

पाली भाषेत

२ यो रागमुदच्छिदा असेसं भिसपुप्फं व सरोरुहं विगय्ह।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।२।।

३ यो तण्हमुदच्छिदा असेसं सरितं सीघसरं विसोसयित्वा१ (१ सी.-विसोसयित्वा.)
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।३।।

४ यो मानमुदब्बधी असेसं नळसेतुं व सुदुब्बलं महोघो।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।४।।

मराठीत अनुवाद :

२. पाण्यांत शिरून जसें (सुलभपणें) कमल तोडावें, तसा ज्यानें कामविकाराचा समूळ त्याग केला आहे तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (२)

३. ज्यानें जोरानें वाहणार्‍या तृष्णा-नदीला शोषवून तिचा समूळ नाश केला आहे तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (३)

४. जसा महौघ देवनळांचा अति-दुर्बळ पूल (सहज) मोडून टाकतो, तसा ज्यानें आपल्या मानाचा (अहंकाराचा) क्षय केला आहे तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel