पाली भाषेतः-

७०२ समानभावं१ (१ अ., म.-समानभागं) कुब्बेथ गामे अक्कुट्ठवन्दितं।
मनोपदोसं रक्खेय्य सन्तो अनुण्णतो चरे।।२४।।

७०३ उच्चावचा निच्छरन्ति दाये अग्गिसिखूपमा।
नारियो मुनिं पलोभेतन्ति ता सु तं मा पलोभयुं।।२५।।

७०४ विरतो मेथुना धम्मा हित्वा कामे परोवरे२ (२ म.-परोपरे.)
अविरुद्धो असारत्तो पाणेसु तसथावरे।।२६।।

७०५ यथा अहं तथा एते, यथा एते तथा अहं।
अत्तानं उपमं कत्वा न हनेय्य न घातये।।२७।।

७०६ हित्वा इच्छं च लोभं च यत्थ सत्तो पुथुज्जनो।
चक्खुमा पटिपज्जेय्य तरेय्य नरकं इमं।।२८।।

मराठी अनुवादः-


७०२. गांवांत गेलं असतां वन्दन आणि निन्दा यांजविषयीं समभावानें वागावें, मनांतील प्रद्वेष आवरावा, व शांत होऊन निगर्वी व्हावें.(२४)

७०३ अरण्यांतील अग्निज्वालांप्रमाणें लहान मोठीं (प्रलोभनें इतस्तत:) संचार करीत असतात. स्त्रिया मुनीला लोभवूं पाहतात. त्यांनीं तुला मोहांत न पाडावें (याबद्दल सावध रहा).(२५)

७०४ लहान मोठे कामोपभोग सोडून स्त्रीसंगापासून विरत हो आणि स्थिर-चर प्राण्यांवर अविरुद्ध व अनासक्त होत्साता रहा. (२६)

७०५ ‘जसा मी तसे हे, व जसे ते तसा मी’ असें आपल्या उदाहरणानें जाणून कोणाला मारूं नये व मारवूं नये. (२७)

७०६ ज्या इच्छेत आणि लोभांत सामान्य जन बद्ध होतो, त्या इच्छेचा आणि लोभाचा त्याग करून चक्षुष्मन्तानें वागावें, व हे नरक तरून जावें. (२८)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel