पाली भाषेत :-

४०८ अगमा राजगहं बुद्धो मगधानं गिरिब्बजं।
पिण्डाय अभिहारेसि आकिण्णवरलक्खणो।।४।।

४०९ तमद्दसा बिम्बिसारो पासादस्मिं पतिट्ठितो।
दिस्वा लक्खणसंपन्नो इममत्थं अभासथ।।५।।

४१० इमं भोन्तो निसामेथ अभिरूपो ब्रह्मा१(१ म.-ब्रह्मा.) सुचि।
चरणेन चेव संपन्नो युगमत्तं च पेक्खति।।६।।

४११ ओक्खित्तचक्खु सतिमा नायं नीचकुलामिव।
राजदूता विधा२वन्तु( २ म.-राजदूताऽभिधावन्तु.) कुहिं भिक्खु गमिस्सति।।७।।

मराठीत अनुवाद :-

४०८. बुद्ध मगधांच्या गिरिव्रजाला-राजगृहाला-गेला, आणि ज्याच्या शरिरावर उत्तम लक्षणें फैलावलीं आहेत, असा तो भिक्षेसाठीं फिरूं लागला. (४)

४०९. आपल्या प्रासादावर बसलेल्या बिंबिसार राजानें त्याला पाहिलें, व त्या लक्षणसंपन्नाला पाहून तो राजा याप्रमाणें बोलला: (५)

४१०. भो, हा पहा कोणीतरी सुन्दर, भव्य पवित्र, वागणुकीनें चांगला केवळ कासर्याइतक्या अंतरावरच खालीं१ (१ युगमात्र—गाडीला किंवा नांगराला जुंपलेल्या बैलाच्या मानेवरील जुवाइतक्याच अंतरावर) दृष्ट ठेवून चालत आहे. (६)

४११. ज्याची दृष्टि खालीं आहे व जो स्मृतिमान, तो हा नीच कुळांतीलसा दिसत नाहीं. हा भिक्षु कोठें जातो हें पाहण्यासाठीं राजदूतांना दवडूं द्या. (७)

पाली भाषेत :-

४१२ ते पेसिता राजदूता पिट्ठितो अनुबन्धिसुं।
कुहिं गमिस्सति भिक्खु कत्थ वासो भविस्सति।।८।।

४१३ सपदानं चरमानो गुत्तद्वारो सुसंवुतो।
खिप्पं पत्तं अपूरेसि संपजानो पतिस्सतो।।९।।

४१४ स पिण्डचारं चरित्वा निक्खम्म नगरा मुनि।
पण्डवं अभिहारेसि एत्थ वासो भविस्सति।।१०।।

४१५ दिस्वान वासूपगतं ततो दूता उपाविसुं।
एको च दूतो आगत्वा राजिनो पटिवेदयि।।११।।

४१६ एस भिक्खु महाराज पण्डवस्स पुरक्खतो।
निसिन्नो व्यग्घुसभो व सीहो व गिरिगब्भरे।।१२।।

मराठीत अनुवाद :-

४१२. याप्रमाणें पाठविलेले ते राजदूत तो भिक्षु कोठें जातो व कोठें राहतो, हें पाहण्यासाठीं त्याच्या मागोमाग गेले. (८)

४१३. गुप्तेन्द्रिय, सुसंवृत, सावध व जागृत अशा त्यानें (लहान मोठें घर वर्ज्य न करतां) ओळीनें भिक्षा घेऊन आपलें पात्र त्वरित भरलें.(९)

४१४. तो मुनि भिक्षा घेऊन व नगरांतून निघून वस्तीला राहण्यासाठीं पांडव पर्वतापाशीं आला.

४१५. वस्तीला राहिलेल्या त्याला पाहून ते दूत तेथेंच बसले, आणि त्यांपैकीं एकानें येऊन राजाला हें वर्तमान दिलें—(११)

४१६. महाराज, तो हा भिक्षु गिरिगव्हरांत राहणार्या  व्याघ्रासारखा, ऋषभासारखा किंवा सिंहासारखा पांडव पर्वताच्या पायथ्याशी बसला आहे. (१२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel