पाली भाषेतः-

८१७ यसो कित्ति१(१ सी.-कित्ति.) च या पुब्बे हायते २वापि(२ सी.-हायते चापि.) तस्स सा।
एतंऽपि दिखा सिक्खेथ मेथुनं विप्पहातवे।।४।।

८१८ संकप्पेहि परेतो सो३(३ Fsb.-यो.) कपणो विय झायति।
सुत्वा परेसं निग्घोसं मंकु होति तथाविधो।।५।।

८१९ अथ सत्थानि कुरुते परवादेहि चोदितो।
एस ख्वस्स महागेधो मोसवज्जं पगाहति।।६।।

८२० पण्डितो ति समञ्ञातो४ (४ म.-पसञ्ञातो.) एकचरियं अधिट्ठितो।
अथापि मेथुने युत्तो मन्दो व परिकिस्सति।।७।।

मराठी अनुवादः-

८१७ त्यानें पूर्वी मिळविलेलें यश व कीर्ति नष्ट होतात, हेंही पाहून स्त्रीसंग सोडण्यास शिकावें.(४)

८१८ तो संकल्पपरायण माणूस दरिद्र्यासारखा चिंतामग्न होतो. तसा तो इतरांनीं केलेली निंदा ऐकून खजील होतो.(५)

८१९ आणि इतरांनीं वादांत आव्हान केलें असतां तो शास्त्रें१(१. शास्त्रे-मूळ सत्थानि; त्याचा अट्ठकथाकारानें ‘शस्त्रे’ असा अर्थ केला आहे. आपणांस व इतरास अपायकारण होतील अशीं वचनें बोलतो. चिनी संस्करण ह्याच अर्थाला जवळ आहे.) रचतो, असा हा महालुब्ध माणूस असत्यांत बुडून जातो.(६)

८२० एकचर्या (संन्यास) पत्करलेला एकादा माणूस ‘पंडित आहे’ अशी ख्याति पावतो; पण तो जर स्त्रीसंग करूं लागला तर मन्दबुद्धि माणसाप्रमाणें क्लिष्ट होतो.(७)

पाली भाषेतः-

८२१ एतमादीनवं ञत्वा मुनि पुब्बापरे इध।
एकचरियं दळ्हं कयिरा१(१ म.-कयिराथ, करियाथ.) न निसेवेथ मेथुनं।।८।।

८२२ विवेकं येव सिक्खेथ एतदरियानमुत्तमं२।(२ म.-एकचरियान.)
तेन३ सेट्ठो न३(३-३म.-न तेन सेट्ठो.) मञ्ञेथ स वे निब्बानसन्तिके।।९।।

८२३ रित्तस्स४(४ सी.-चित्तस्स) मुनिनो चरतो कामेसु अनपेक्खिनो।
ओघतिण्णस्स पिहयन्ति कामेसु गथिता५(५ म.-गधिता.) पजा ति।।१०।।

तिस्समेत्तेय्यसुतं निट्ठितं।

मराठीत अनुवाद
:-


८२१ पूर्व आणि अपर वर्तनांतील फरकामुळें उत्पन्न होणारा हा दोष पाहून मुनीनें या जगांत एकचर्या दृढ करावी व स्त्रीसंग करूं नये.(८)

८२२ एकान्तच शिकावा. तोच आर्यांना उत्तम वाटतो. तेणें करून त्यानें आपणांस श्रेष्ठ समजूं नये. तोच निर्वाणाच्या अगदीं जवळ आहे असें जाणावें.(९)

८२३ कामोपभोगांत अनपेक्ष होऊन एकान्तांत राहणार्‍या ओघतीर्ण मुनीचा कामोपभोगांत गुंतलेले लोक हेवा करतात.(१०)

तिस्समेत्तेय्यसुत समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel