पाली भाषेत :-

८१ गाथाऽभिगीतं मे अभोजनेय्यं। संपस्सतं ब्राह्मण नेस धम्मो।
गाथाभिगीतं पनुदन्ति बुद्धा। धम्मे सति ब्राह्मण वुत्तिरेसा।।६।।

८२ अञ्ञेन च केवलिनं महेसिं। खीणासवं कुक्कच्चवूपसन्तं।
अन्नेन पानेन उपट्ठहस्सु। खेत्तं हि तं पुञ्ञऽपेक्खस्स होती ति।।७।।

अथ कस्स चाहं भो गोतम इमं पायासं दम्मी ति। न खोऽहं तं ब्राह्मण पस्सामि सदेवके लोके समारके सब्रह्मके सस्समणब्राह्मणिया पजाय सदेवमनुस्साय यस्स सो पायासो भुत्तो सम्मा परिणामं गच्छेय्य अञ्ञत्र तथागतस्स वा तथागतसावकस्स वा; तेन हि त्वं ब्राह्मण तं पायासं अप्पहरिते वा छड्डेहि, अप्पाणके वा उदके ओपिलापेहि ति। अथ खो कसिभारद्वजो ब्राह्मणो तं पायासं अप्पाणके उदके ओपिलापेसी ति। अथ ख ओ सो पायासो उदके पक्खित्तो चिच्चिटायति चिटिचिटायति सन्धूपायति सभ्पधूपायति। सेय्यथाऽपि नाम फालो दिवससन्ततो उदके पक्खित्तो चिच्चिटायति चिटिचिटायति सन्धूपायति सभ्पधूपायति, एवमेव सो पायासो उदके पक्खित्तो चिच्चिटायति चिटिचिटायति सन्धूपायति सभ्पधूपायति। अथ खो कसिभारद्वाजो ब्राह्मणो संविग्गो लोमहट्ठजातो येन भगवा तेनुपसंकमि, उपसंकमित्वा भगवन्तं पादेसु सिरसा निपतित्वा भगवन्तं ऐतदवाच—अभिक्कन्तं भो गोतम, अभिक्कन्तं भो गोतम। सेय्यथाऽपि भो गोतम निक्कुज्जितं वा उक्कुज्जेय्य, पटिच्छन्नं वा विवरेय्य, मूळहस्स वा मग्गं आचिक्खेय्य, अन्धकारे वा तेलपज्जोतं धारेय्य चक्खुमन्तो रूपानि दक्खिन्ती ति, एवमेवं भोता गोतमेन अनेकपरियायेन धम्मो पकासितो | एसाहं भगवन्तं गोतमं सरणं गच्छामि धम्मं च भिक्खुसंघं च। लभेय्याह भोतो गोतमस्स सन्तिके पब्बज्जं, लभेय्यं उपसंपदं ति।
अलत्थ खो कासिभारद्वाजो ब्राम्हणो भगवतो सन्तिके पब्बज्जं, अलत्थ उपसंपदं| अचिरूपसम्पन्नो खो पनायस्मा भारद्वाजो एको वूपकट्ठो अप्पमत्तो आतापी पहितत्तो विहरन्तो न चिरस्सेव यस्सऽथाय कुलपुत्ता सम्मदेव अगारस्मा अनगारियं पब्बजन्ति तदनुत्तरं ब्रह्मचरियपरियोसानं दिट्ठे व धम्मे सयं अभिञ्ञा सच्छिकत्वा उपसंपज्ज विहासि। खीणा जाति, वुसितं ब्रह्मचरियं, कतं करणीयं, नापरं इत्थत्ताया ति अब्भञ्ञासि। अञ्ञतरो च खो पनायस्मा भारद्वाजो अरहतं अहोसी ति।

कसिभारद्वाजसुत्त निट्ठितं

मराठीत अनुवाद :-


८१. (भगवान् म्हणाला) – अन्नासंबंधीं मी गाथा बोललों, तेव्हां तें मला स्वीकारतां येत नाहीं. हे ब्राह्मणा, (तें स्वीकारणें) हा जाणत्याचा धर्म नव्हे. ज्या अन्नासंबंधीं गाथा म्हटल्या, तें बुद्ध स्वीकारीत नसतात. हे ब्राह्मणा, सदाचाराला ही पद्धत योग्य आहे. (६)

८२. कैवल्य प्राप्त झालेल्या क्षीणपाप व कौकृत्य१ (१. ९२५ व्या गाथेंतील ह्या शब्दावरील टीप पहा.) शान्त झालेल्या महर्षींची तूं अन्य अन्नपानानें सेवा कर. कां कीं पुण्येच्छूला तो पुण्यक्षेत्रासारखा होय.

“भो गोतम, असें जर आहे, तर हा पायस मी दुसर्‍या कोणास देऊं?” “हे ब्राह्मणा, तथागताशिवाय किंवा तथागतश्रावकाशिवाय सदेवक, समारक, सब्रह्मक लोकांत, श्रमणब्राह्मणांत, देवमनुष्यांत असा कोणी मला दिसत नाहीं कीं, ज्याला हा पायस खाल्ला असतां पचेल. म्हणून, हें ब्राह्मणा, तूं हा पायस गवत नसलेल्या ठिकाणीं टाक किंवा प्राणी नसलेल्या पाण्यांत टाक.” तेव्हां कृषिभारद्वाज-ब्राम्हणानें तो पायस प्राणी नसलेल्या पाण्यांत टाकला. तो पायस पाण्यांत टाकला असतां ‘चिटचिट’ शब्द करूं लागला व वाफ सोडूं लागला. जसा दिवसभर सन्तप्त झालेला नांगराचा फाळ पाण्यांत टाकला असतां ‘चिटचिट’ शब्द करतो, वाफ सोडतो, तसाच तो पायस ‘चिटचिट’ शब्द करूं लागला व वाफ सोडूं लागला. तेव्हां कृषिभारद्वाज-ब्राम्हणाला संवेग झाला, रोमहर्ष झाला, व भगवंतापाशीं येऊन भगवन्ताच्या पायांवर साष्टांग दंडवत घालून भगवन्ताला म्हणाला, “धन्य धन्य, भो गोतम, जसें पालथें पडलेलें भांडें नीट करावें, किंवा झांकलेली वस्तु विवृत करावी, वाट चुकलेल्याला वाट दाखवावी, किंवा डोळसांना पदार्थ दिसावे या उद्देशानें अंधारांत मशाल पाजळावी, त्याप्रमाणें भवान् गोतमानें अनेक पर्यायांनीं धर्मं प्रकाशित केला आहे. हा मी भगवान् गोतमाला शरण जातों, धर्माला शरण जातों, आणि भिक्षुसंघाला शरण जातों, भगवान् गोतमापाशीं मला प्रव्रज्या आणि उपसंपदा मिळावी.”

त्याप्रमाणें कृषिभारद्वाज-ब्राम्हणाला भगवंतापाशीं प्रव्रज्या व उपसंपदा मिळाली. उपसंपदेनंतर थोड्याच काळांत आयुष्मान् भारद्वाज एकाकी, एकान्तवासी, अप्रमादी, उत्साही व प्रहितात्मा होऊन राहत असतां, ज्याच्यासाठीं कुलीन मनुष्य चांगल्या रीतीनें घरांतून निघून अनागारिक प्रव्रज्या घेतात, तें अनुत्तर ब्रह्मचर्य-पर्यवसान (निर्वाण) याच आयुष्यांत स्वत: जाणून, साक्षात् अनुभवून, प्राप्त करून घेऊन राहिला. जन्म क्षीण झाला, ब्रम्हचर्य आचरिलें, कर्तव्य केलें, व आतां पुनर्जन्म राहिला नाहीं हें त्यानें जाणलें आणि आयुष्मान् भारद्वाज अरहन्तांपैकी एक झाला.

कसिभारद्वाजसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel