पाली भाषेत :-

२०८ यो जांतमुच्छिज्ज न रोपयेय्य। जायन्तमस्स नानुप्पवेच्छ।
तमाहु एकं मुनिनं चरन्तं। अद्दक्खि१ (१ म., सी.- अदक्खि.) सो सन्तिपदं महेसि२  (२ म.- महेसिं.) ।।२।।

२०९ संखाय वत्थूनि पहाय३ (३ रो., अ.- पमाय; म.-समाय.) बीजं। सिनेहमस्स नानुप्पवेच्छे।
स वे मुनी४ (४ म.- मुनि.) जातिखयन्तदस्सी। तक्कं पहाय न उपेति संखं।।३।।

२१० अञ्ञाय सब्बानि निवेसनानि। अनिकामयं अञ्ञतरंऽपि तेसं
स वे मुनी वीतगेधो अगिद्धो। नायूहति पारगतो हि होति।।४।।

२११ सब्बाभिभुं सब्बविदुं सुमेधं। सब्बेसु धम्मेसु अनूपलित्तं।
सब्बंजहं तण्हक्खये विमुत्तं। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।५।।

मराठी अनुवाद :-

२०८. जो उद्भवलेल्या (मनोदोषाचा) उच्छेद करून त्याला पुन: वाढूं देत नाहीं व उद्भवणार्‍यालाही कोणत्याही तर्‍हेनें उत्तेजन देत नाहीं, त्या एकाकी राहणार्‍याला मुनि म्हणतात; त्या महर्षीनें शान्तिपद पाहिलें आहे. (२)

२०९. पदार्थ जाणून व त्यांच्या बीजांचा त्याग करून जो त्यांना स्नेह (ओलावा) देत नाहीं, तो खरोखर जन्मक्षयान्तदर्शी मुनि होय. तो तर्क सोडून देऊन पुन: नामाभिधान (जन्म) पावत नाहीं. (३)

२१०. जो सर्व प्रकारचे भव१ (१. कामभवादि सर्व भव, ज्यांत मनुष्य प्रवेश करूं शकतो.) जाणतो व त्यांपैकीं एकाचीही इच्छा धरीत नाहीं; तो वीततृष्ण निर्लोभी मुनि भवोत्पादक कर्म करींत नाहीं; कारण तो पार जातो. (४)

२११. जो सर्व जिंकणारा, सर्व जाणणारा, सुबुद्धि, सर्व पदार्थींपासून अलिप्त राहणारा, सर्वांचा त्याग करणारा व तृष्णाक्षयानें मुक्त झालेला—त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to सुत्तनिपात


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
श्यामची आई
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
अजरामर कथा
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
शिवाजी सावंत
रत्नमहाल