पाली भाषेत :-

२०५ दिपादकोऽयं१ (१ म.-द्विपादकोऽयं.) असुचि दुग्गन्धो परिहीरति।
नानाकुणपपरिपूरो विस्सवन्तो ततो ततो।।१३।।

२०६ एतादिसेन कायेन यो मञ्ञे उण्णमेतवे।
परं वा अवजानेय्य किमञ्ञत्र अदस्सनाति।।१४।।

विजयसुत्तं२(२ अ.- ‘कायविच्छन्दनिकसुत्तं’ तिऽपि) निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-


२०५. हा दोन पायांचा, अशुचि, दुर्गन्ध व अनेक घाणेरड्या पदार्थानीं भरलेला व त्या त्या (अवयवांतून) पाझरणारा (पुष्पगन्धादींनीं नटवून) जगविला जातो. (१३)

२०६. अशा देहानें जो गर्विष्ठ होणें योग्य मानील, किंवा दुसर्‍याची अवहेलना करील, त्याला ज्ञानान्धत्वावांचून दुसरें कारण कोणतें? (१४)

विजयसुत्त समाप्त

पाली भाषेत :-                                   १२
[१२. मुनिसुत्तं]

२०७ सन्थवातो३ (३ म.- संघवतो.) भयं जातं निकेता जायते रजो।
अनिकेतमसन्थवं एतं वे मुनिदस्सनं।।१।।

मराठीत अनुवाद :-
१२
[१२. मुनिसुत्त]


२०७. स्नेहापासून भय उत्पन्न होतें आणि घरापासून मळ उत्पन्न होतो; म्हणून अनागार आणि नि:स्नेहता हेंच मुनीचें तत्त्वज्ञान होय.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel