पाली भाषेत :-

५६ निल्लोलुपो निक्कुहो निप्पिपासो निम्मक्खो निद्धन्तकसावमोहो।
निरासयो१ (१ नि.-निरससो.) सब्बलोके भवित्वा एको चरे खग्गविसाणकप्पो।।२२।।

५७ पापं सहायं परिवज्जयेथ अनत्थदस्सिं विसमे निविट्ठं।
सयं न सेवे पसुतं पमत्तं एको चरे खग्गविसाणकप्पो।।२३।।

५८ बहुस्सुत्तं धम्मधरं भजेथ मित्तं उळारं पटिभानवन्तं।
अञ्ञाय अत्थानि विनेय्य कंखं एको चरे खग्गविसाणकप्पो।।२४।।

५९ खिड्डं२ (२ म.-खिड्डारतिं.) रतिं कामसुखं च लोके अनलंकरित्वा अनपेक्खमानो।
विभूसनट्ठाना३ (३ नि. (सी.)-विभूसट्ठना.) विरतो सच्चवादी एको चरे खग्गविसाणकप्पो।।२५।।

मराठीत अनुवाद  :-


५६. निर्लोलुप, अदांभिक, निस्तृष्ण, गुणज्ञ, कषाय (क्लेश)-मोहापासून मुक्त व सर्व लोकीं निर्लोभ होऊन गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२२)

५७. असदर्थांचा उपदेश करणारा व विषम मार्गांत निविष्ट अशा पापी साथ्याचा त्याग करावा; आपण होऊन अशा आसक्त आणि प्रमत्त माणसाची संगति धरूं नये, (व) गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२३)

५८. बहुश्रुत, धर्मधर, उदार व प्रतिभासंपन्न अशा मित्राची संगत धरावी, व (त्याजकडून) सदर्थ समजून घेऊन व शंकेचें निरसन करून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२४)

५९. क्रीडा, मजा, चैन-एवढ्यानें इहलोकीं समाधान न मानत व याची अपेक्षा न धरतां शृंगारभूषणांपासून निवृत्त व सत्यवादी होऊन गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel