पाली भाषेत  :-

६८ आरद्धाविरियो परमत्थपत्तिया अलीनचित्तो अकुसीतवुत्ति।
दळ्हनिक्कमो थामबलूपपन्नो एको चरे खग्गविसाणकप्पो।।३४।।  

६९ पटिसल्लानं झानमरिञ्चमानो धम्मेसु निच्चं अनुधम्मचारी।
आदीनवं सम्मसिता भवेसु एको चरे खग्गविसाणकप्पो।।३५।।

७० तण्हक्खयं पत्थयं अप्पमत्तो अनंलमूगो सुतवा सतीमा।
संखातधम्मो नियतो पधानवा एको चरे खग्गविसाणकप्पो।।३६।।

७१ सीहो व सद्देसु असन्तसन्तो वातो व जालम्हि असज्जमानो।
पदुमं व तोयेन अलिप्पमानो१ (१ सी., म.-अलिंप) एको चरे खग्गविसाणकप्पो।।३७।।

मराठीत अनुवाद :-

६८. परमार्थप्राप्तीसाठीं पूर्ण उत्साही, समाधानचित्त, निरलसवृत्ति, दृछनिश्चयी व स्थिर (ज्ञान) बलसंपन्न होऊन गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३४)

६९. एकान्तवास आणि समाधि न सोडतां, नित्य सद्धर्मानुसार वागणारा व पुनर्जन्मांत दोष पाहणारा होऊन गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३५)

७०. तृष्णाक्षयाची उत्कट इच्छा बाळगणारा, अप्रमादी, हुशार१, (वेडगळ नसलेला) विद्वान् स्मृतिमान्, धर्मज्ञानी, आर्यमार्ग जाणून त्याची प्राप्ति करून घेतलेला व उत्साही होऊन गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३६)

७१. सिंहाप्रमाणें शब्दांना न घाबरतां, वार्‍याप्रमाणें जाळ्यांत न अडकतां, व कमलाप्रमाणें पाण्यांत न लिंपतां गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel