पाली भाषाः-

८३० या उण्णति१(१ Fsb.-ती.) साऽस्स२(२ म.-सास, तस्स.) विघातभूमि। मानातिमानं वदते पनेसो।
एतंऽपि दिस्वा न विवादयेथ। नहि तेन सुद्धिं३(३ म.-सुद्धि.) कुसला वदन्ति।।७।।

८३१ सूरो यथा राजखादाय पुट्ठो४(४ म.-फुट्ठो.)। अभिगज्जमेति पटिसूरमिच्छं।
येनेव सो तेन पलेहि५(५ म.-पलेति.) सूर६(६ म.-सुरं, पुर.)। पुब्बे व नत्थि यदिदं युधाय।।८।।

८३२ ये दिट्ठिमुग्गय्ह विवादियन्ति७(७ म.-विवादयन्ति.)। इदमेव सच्चं ति च वादियन्ति।
ते त्वं वदस्सु८(८ म.-वरस्सु.) न हि ते ध९(९ म.-च.) अत्थि। वादम्हि जाते पट्सेनिकत्ता।।९।।

मराठी अनुवादः-


८३० पण हा जो गर्व तोच याच्या घाताचा पाया होय. (कारण), हा मनुष्य आपला मान (अहंकार) आणि अतिमान इतरांना दाखवीतच असतो. हाही प्रकार पाहून माणसानें वादांत शिरूं नये. कारण वादानें शुद्धि होत नाहीं असें सुज्ञ म्हणतात.(७)

८३१ राजाच्या अन्नावर पोसलेला शूर जसा प्रतिशूर पाहत गर्जना करीत जातो, तसा हा वादी होय. पण, बा शूरा, तूं शूराच्याच मागें लाग. युद्ध करण्याला प्रवृत्त करणारा (जो अहंकार) तो माझा पूर्वीच नष्ट झाला आहे.(८)

८३२ जे सांप्रदायिकतेला पकडून वादविवाद करतात व आपलें तेवढें सत्य असें प्रतिपादन करतात, त्यांजपाशीं जाऊन तूं वाद कर. कारण तूं वाद सुरूं केलास तर प्रतिवादी होऊन उभा राहाणारा येथें तुला सांपडणार नाहीं.(९)

पाली भाषेतः-

८३३ विसेनिकत्वा पन ये चरन्ति१(१ म.-वदन्ति.)। दिट्ठीहि दिट्ठिं अविरूज्झमाना।
तेसु त्वं कि२(२ म.-किर.) लभेथो३(३ म.-लभेथ.) पसूर४(४ म.-समुद्द.)। येसीध नत्थिं५(५ Fsb.-नत्थी.) परमुग्ग्गहीतं६(६ म.-परमं.)।।१०।।

८३४ अथ तं पवितक्कमागमा७(७ म.-सवितक्क.)। मनसा दिट्ठिगतानि चिन्तयन्तो।
धोनेन युगं समागमा। न हि त्वं सग्घसि८(८ सी.-पग्घसि, म.-अग्घसि, नि.-सक्खसि.)
संपयातवे ति।।११।।

पसूरसुत्तं निट्ठितं।

मराठी अनुवादः-

८३३. पण जे प्रतिपक्षबुद्धि नाहींशी करून रहातात व आपल्या पंथास्तव दुसर्‍या पंथांशीं विरोध करीत नाहींत, व ज्यांना आपलाच पंथ श्रेष्ठ असें वाटत नाहीं, त्यांजपाशीं, हे प्रशूरा, तुला काय मिळणार?(१०)

८३४ आणि सांप्रदायिक मतांचा विचार करीत असतां तुझ्या मनांत वादबुद्धि उद्भवली. पण येथें धूतपापाशीं प्रसंग असल्यामुळें तुला वाद चालवितां येणें शक्य नाहीं.(११)

पसूरसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to सुत्तनिपात


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
श्यामची आई
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
अजरामर कथा
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
शिवाजी सावंत
रत्नमहाल