पाली भाषेत :-

५१५. सब्बत्थ उपेक्खको सतीमा | न सो हिंसति किंचि सब्बलोके |
तिण्णो समणो अनाविलो | उस्सदा यस्स न सन्ति सोरतो सो ||६

५१६. यस्सिन्द्रियानि भावितानि | अज्झत्तं बहिध्दा च सब्बलोके |
निब्बिज्ज१(१ अ.-निब्बिज्झ.) इमं परं च लोकं | कालं कंखति भावितो स दन्तो ||७||

५१७. कप्पानि विचेय्य केवलानि | संसारं दुभयं चुतूपपातं |
विगतरजमनंगणं विसुध्दं | पत्तं जातिक्खयं तमाहु बुध्दं ||८||
अथ खो सभियो परिब्बाजको भगवतो भासितं अभिनन्दित्वा अनुमोदित्वा अत्तमनो पमोदितो उदग्गो पीतिसोमनस्सजातो भगवन्तं उत्तरिं पञ्हं पुच्छि -

मराठीत अनुवाद :-

५१५. जो सर्व ठिकाणीं उपेक्षायुक्त आणि स्मृतिमान् होऊन या सर्व जगांत कोणाचीही हिंसा करीत नाहीं, जो श्रमण उत्तीर्ण व अनाविल, आणि ज्यासा (रागद्वेषादिक) उत्सद१(१ लाभ, द्वेष, मोह, अहंकार, कुदृष्टि, क्लेश आमि दुश्चरित हे सात उत्सद जाणावेत.) नाहींत, तो सुशान्त होय. (६)

५१६. या सर्व जगांत ज्याची इंद्रियें, बाह्य व अभ्यंतरीचीं, आटोक्यांत आलीं. व इहलोक व परलोक ह्याबद्दल उबग२(२. टीकाकार ‘निब्बिज्झ’ असा पाठ घेऊन ‘इहलोक व परलोक जाणून’ असा अर्थ करतो.) उत्पन्न होऊन जो भावितात्मा मरणाची प्रतीक्षा करतो, तो दान्त होय. (७)

५१७. सकल विकल्प, संसार व (त्याबरोबरच येणारें) जन्म आणि मरण हीं दोन्ही जाणून व विगतरज, निष्पाप, आणि विशुद्ध होऊन जो जन्मक्षय पावलेला आहे, त्यास बुद्ध म्हणतात. (८)

त्यावर सभिय परिव्राजकानें भगवन्ताच्या बोलण्याचें अभिनंदन आणि अनुमोदन करून व हृष्ट, तुष्ट, उल्हासित आणि प्रीतिसौमनस्ययुक्त होऊन भगवन्ताला आणखी प्रश्न विचारला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel