पाली भाषेत :-

४५५ न ब्राह्मणो नोऽम्हि न राजपुत्तो। न वेस्सायनो उद१(१म.-नुद.) कोचि नोऽम्हि।
गोत्तं परिञ्ञाय पुथुज्जनानं। अकिंचनो मन्त चरामि लोके।।१।।

४५६ संघाटिवासी अगहो२(२सी., अ.-अगिहो.) चरामि।निवुत्तकेसो अभिनिब्बुतऽत्तो।
अलिप्पमानो इध माणवेहि। अक्कल्ल३(३म.-अकल्लं.) मं (ब्राह्मण) पुच्छसि४(४ रो.-पुच्छि.) गोत्तपञ्हं।।२।।

४५७ पुच्छन्ति वे भो ब्राह्मणा ब्राह्मणेहि। सह ब्राह्मणो नो भवं ति।
ब्राह्मणो चे त्वं ब्रूसि मं च ब्रूसि अब्राह्मणं।
तं सावित्तिं पुच्छामि तिपदं चतुवीसतक्खरं।।३।।

मराठीत अनुवाद :-

४५५. मी ब्राह्मण नव्हे कीं, राजपुत्र नव्हे. वैश्य नव्हे, अथवा कोणीहि नव्हे. सामान्य जनांचें गोत्र ओळखून अकिंचन असा मी इहलोकीं प्रज्ञापूर्वक वागतों.

४५६. संघाटी (चीवर) पांघरून, मुंडन करून, शांतचित्त, गृहरहित व मनुष्यांपासून अलिप्त होऊन मी लोकांत फिरत असतो. तेव्हां हे ब्राह्मणा, तुझा हा गोत्रासंबंधीचा प्रश्न अनाठायीं आहे.(२)

४५७. (भारद्वाज-) भो, ब्राह्मण ब्राह्मणाला ‘तूं ब्राह्मण आहेस काय?’ असें विचारतात. (भगवान्-) तूं आपणांला ब्राह्मण म्हणवतोस, व मला अब्राह्मण म्हणतोस; तर मी तुला तीन पादांची व चोवीस अक्षरांची सावित्री विचारतों.(३)

पाली भाषेत :-

४५८ “किं निस्सिता इसयो मनुजा खत्तिया ब्राह्मणा।
देवतानं यञ्ञमकप्पयिंसु पुथु इध लोके”।
“यदन्तग् वेदगू यञ्ञकाले।
यस्साहुतिं लभे तस्सिज्झे ति ब्रूमि।।४।।

४५९ अद्धा हि तस्स हुतमिज्झे (ति ब्राह्मणो)। यं तादिसं वेदगुं अद्दसाम।
तुम्हादिसानं हि अदस्सनेन। अञ्ञो जनो भुञ्ञति पूरळासं।।५।।

४६० तम्मातिह त्वं ब्राह्मण अत्थेन। अत्थिको उपसंकम्म पुच्छ।
सन्तं विधूमं अनिघं निरासं। अप्पेविध अभिविन्दे सुमेधं।।६।।

मराठीत अनुवाद :-

४५८. (भारद्वाज-) ऋषि, क्षत्रिय, ब्राह्मण व इतर मनुष्य या जगांत देवतांना उद्देशून निरनिराळे यज्ञ कशासाठीं करतात? (भगवान्-) मी म्हणतों कीं यज्ञकालीं दु:खान्तगाला आणि वेदपारगाला ज्याच्याकडून दान मिळेल त्याचा यज्ञ सफल होईल.(४)

४५९. तर मग खात्रीनें माझा यज्ञ सफल होईल असें ब्राह्मण म्हणाला. कारण, माझी तुझ्यासारख्या वेदपारगाची भेट झाली. तुमच्यासारख्याची भेट न झाल्याकारणानें इतर जनांना पुरोडाश द्यावा लागतो.(५)

४६०. (भगवान्-) असें जर आहे, तर हे ब्राह्मणा, सदर्थाची इच्छा करणारा असा तूं मजपाशीं ये, आणि मला प्रश्न विचार. या जगांत शांत, निर्धूम, निर्दु:ख, निस्तृष्ण व सुज्ञ असा कोण, हें तूं जाणूं शकशील.(६)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel