हल्ली फेसबुक व्हॉट्सअॅप इत्यादी सोशल मीडियावर हे करा हे करू नका हे चांगले हे वाईट इत्यादीचा सुळसुळाट झालेला दिसून येतो.वाचणारा वाचतो व  विसरून जातो. एखादा हे मला केव्हाच माहिती होते किंवा हे पूर्वी येऊन गेलेले आहे असे म्हणतो .एखादा ते जसेच्या तसे फॉरवर्ड करतो .एखाद्यावर काही परिणामही होतो .एखादा वाचतही नाही मनात म्हणतो आला मोठा अक्कल शिकवणारा .त्यावरून मला सुचलेले काही विचार .हेही एखादा हे करा हे करू नका अशाच प्रकारचे आहेत असे कदाचित म्हणेल किंवा वरील पैकी एखादी प्रतिक्रिया देईल असो .मलाही सांगितल्याशिवाय म्हणजेच लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहितो.

वाचा फक्त वाचा एवढेच मी म्हणतो . अनाग्रह योग याचा अर्थ सहज  कळण्यासारखा आहे 

कोणत्याही प्रकारचा आग्रह  न धरणे म्हणजे अनाग्रह योग. हा योग समजण्यासाठी आपण कोणतीही व्यक्ती नेहमी काय करत असते ते पाहू या.  प्रत्येकजण नेहमी हे झाले पाहिजे हे होता कामा नये असा विचार करत असतो. हा विचार मुलांबद्दल असेल , पती पत्नी यांचा परस्परांबद्दल असेल, एखाद्या घटनेबद्दल असेल, देशाबद्दल असेल किंवा एखाद्या तत्त्वज्ञानाबद्दलही  असेल आपल्या मनाची ठेवण हे झाले पाहिजे हे होता कामा नये अशीच असते.


मनाची ठेवण अशी का असते ते पाहूया. आपल्या धर्माप्रमाणे लहानपणापासून आपल्यावर निरनिराळे संस्कार होत असतात. त्यातून देवधर्म किंवा निरनिराळी कर्मे कशी करावी ते आपल्याला सांगितले जाते. हिंदू मुसलमान ख्रिश्चन जैन बुद्ध धर्मीय त्याचप्रमाणे निरनिराळया  प्रदेशातील देशातील लोक वेगवेगळ्या प्रकारे विचार करीत असतात  एकाच धर्माचे परंतु निरनिराळ्या कालखंडातील व निरनिराळ्या प्रदेशांतील लोक वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात .यातूनच रुढी प्रथा चालीरीती  निरनिराळे समज गैरसमज समाजात निर्माण होत असतात .यातून अपेक्षा निर्माण होतात।या सर्वांचा व्यक्तीच्या मनावर पगडा असतो त्या प्रमाणे प्रथम मानसिक पातळीवर विचार व नंतर कृती होत असते.अापण ज्या काळात ज्या समाजात ज्या कुटुंबात वाढत असतो त्याप्रमाणे  आपले विचार असतात.क्षणभर अापण असा विचार करावा की आपण जर दुसऱ्या कुटुंबात असतो ,दुसऱ्या धर्मात असतो ,दुसऱया प्रदेशात, दुसऱ्या देशात, किंवा दुसऱ्या कालखंडात असतो, तर  आपण कसा विचार केला असता .आपण नियतीच्या हातातील बाहुले आहोत. आपले आपल्या विचारांवर नियंत्रण आहे असे वाटत असते. परंतु तो एक भास असतो.  प्रत्यक्षात आपण कळसूत्री बाहुली प्रमाणे वागत असतो .आपण जोर जोराने हमरीतुमरीवर येऊन ठामपणे आपली मते मांडत असतो.ही मते अंतिम आहेत याशिवाय दुसरे काही सत्य नाही असा आपला आव असतो .प्रत्यक्षात बटन दाबल्यावर गाणे वाजावे त्याप्रमाणे आपण वाजत असतो.


हे एकदा लक्षात आले म्हणजे स्वाभाविकच आपला अभिनिवेश कमी होतो किंंवा नाहीसा होतो.आपण अंतर्मुख होतो .प्रत्येक वेळी अभिनिवेश आला की आतून कुणीतरी दटावतो व अभिनिवेश  नाहीसा होतो.निदान कमी तरी होतो.आपला आग्रह हळूहळू कमी होतो  .हे सर्व आपोआपच होते हळूहळू मन शांत होते व आपला नेहमी असणारा आग्रह कमी झालेला नाहिसा झालेला आढळून येतो .साक्षीत्व  अलिप्तता निवड रहित  जागृतता म्हणजेच अनाग्रह योग होय .  दुसरे तावातावाने बोलत असताना त्यामागील धारणा लक्ष्यात येते आपल्या मानसिक व बाह्य हालचालींवर आतून आपोआप लक्ष्य ठेवले जाते.हाच अनाग्रहयोग होय. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel