आपण जर अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्या मनात अपेक्षा ठासून भरलेल्या आढळतील अशीच स्थिती प्रत्येक व्यक्तीची आहे आई वडील, मुलांबद्दल मुले आई वडिलांबद्दल , पती पत्नी बद्दल, पत्नी पतीबद्दल ,मित्र मित्रांबद्दल, नेता राजकीय पुढारी सामाजिक धुरीण शासन या प्रत्येकाबद्दल आपण काही ना काही अपेक्षा  बाळगून असतो असे आढळून येते त्याचप्रमाणे पुढारी शासन इत्यादिकांंच्या जनतेबद्दल ही काही अपेक्षा असतात या अपेक्षा प्रत्येकाने कसे वागावे काय करावे याबद्दल असतात स्वत:च्या स्वत:बद्दलही अपेक्षा असतात .

या  प्रत्येकाच्या मनात असतात परंतु प्रत्येक जण आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरताना दिसतो . जर अपेक्षा पूर्ण झाल्या तर सुख होते व अपेक्षा भंग झाला तर दुःख होते.या अपेक्षा आपणच निर्माण केलेल्या असतात त्यातून सुख दुःख निर्मिती होत असते व त्यामुळे आणखी आणखी अपेक्षा निर्माण होत असतात .सुख दुःखाचे निर्माते अापणच असतो व दोष मात्र दुसर्यांना नेहमीच देत असतो .अपेक्षा ठेवाव्या असेही मी म्हणत नाही किंवा त्या ठेवू नये असेही मी म्हणत नाही  अपेक्षा असतात त्यामुळे सुखदुःख निर्मिति होते तेव्हा आपणच सर्वांचे निर्माते आहोत ही वस्तुस्थिती समजून घ्यावी एवढेच माझे म्हणणे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
प्रभाकर पटवर्धन

प्रतिक्रिया देणे अवघड आहे का?नक्कीच अवघड आहे.मी एकदा दिलेली प्रतिक्रिया अॅपने घेतली नाही.मला ठोकरून लावले.प्रतिक्रिया वाचली की लेखकाला बरे वाटते.कांही जण वाचतात सोडून देतात.सर्वच वाचक वाचून सोडून देत असतील असे वाटत नाही.कोण चुकत आहे?लेखक वाचक कि प्रतिक्रिया देणारा?मी गोंधळलेला आहे.मज पामराचा गोंधळ कुणी दूर करील काय?अॅपमध्ये तर काही त्रुटी नाही ना ?

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to विचारतरंग


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
अजरामर कथा
गांवाकडच्या गोष्टी
पैलतीराच्या गोष्टी
कल्पनारम्य कथा भाग १
लोकभ्रमाच्या दंतकथा
खुनाची वेळ
कथा: निर्णय
गावांतल्या गजाली