सत्ता संपत्ती समाजसेवा लोकामध्ये वाहवा मानमरातब विद्या भक्ती स्वतःचा शोध इत्यादी. पुन्हा सत्ता म्हणजे आर्थिक राजकीय सामाजिक इत्यादी अशी अनेक उद्दिष्टे सांगता येतील . 
हे सर्व आपल्याला कशाला पाहिजे? असे जर विचारले तर एकच उत्तर संभवते की मला त्यापासून सुख मिळेल म्हणजेच मनुष्यांची सर्व धडपड सुखासाठी चाललेली आहे हे मान्य होण्याला हरकत नसावी. 
आता सुख म्हणजे काय? प्रत्येकाचे सुख वेगवेगळ्या गोष्टींमध्ये का असते ? याचे कारण प्रत्येक जण निरनिराळ्या वातावरणात  परिस्थितीत वाढतो . जन्मत:  मूल कोरे असते असे मानता येईल. हळूहळू घर शेजारी शाळा मित्र वाचन पुस्तके  इत्यादीमुळे तो अनेक ठसे गोळा करतो. यामुळे  त्यांची एक विशिष्ट मनोरचना बनते
यालाच धारणा असे म्हणता येईल. धारणे प्रमाणे त्याची सुखाची व्याख्या असते व त्याप्रमाणे तो कर्म करीत असतो.
म्हणजेच सुख किंवा दुःख हे आपणच निर्माण केलेले असते ते बाह्य गोष्टी मध्ये नसते असे  मान्य होण्यामध्ये अडचण नसावी. आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडल्या तर सुख व न घडल्या तर दुःख.
एखादाम्हणेल की एकाच परिस्थितीत वाढलेल्या दोन व्यक्ति संपूर्णपणे निरनिराळया  का असतात ?संभाव्य उत्तर जन्माबरोबरच काही सुप्त धारणा अस्तित्वात असावी त्याप्रमाणे व्यक्ति ठसे सन्स्कार घेते. ती पुनर्जन्मा मुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल त्या चर्चेमध्ये आपण आता जाण्याचे कारण नाही . सुखदुःखाचे निर्माते आपणच आहोत याबद्दल दुमत नसावे. हे एकदा लक्षात आले की व्यक्ती सुखामुळे हुरळून जाणार नाही किंवा दुःखामुळे कष्टी होणार नाहि. हे आपणच सर्व निर्माण करतो हे पाहून त्याला कौतुक वाटेल.
मी सुखदुःख हे शब्द मानसिक स्थितीला  वापरीत आहे शारीरिक स्थितीला नाही शारीरिक दुखे ही शरीराला होणार.उपलब्ध शास्त्राप्रमाणे व आर्थिक सामर्थ्यानुसार उपाय आपण करीत राहणार ते सर्व शारिरीक पातळीवर मी मानसिक पातळी.बद्दल बोलत आहे. मानसिक दुखे आपल्याला जास्त हतबल करतात. depression ते हेच होय हे एकदा लक्षात आले की आपण विशिष्ट मनस्थितीला पोचतो. यालाच निवड रहित जागरूकता असे म्हणता येईल.यातूनच धारणासमज आपले आपणच ऐकणे अस्तित्वात येइल. त्यातून दुसऱ्याचे म्हणणे आपल्याला खऱ्या अर्थाने कळू  शकेल. दुसऱ्याचे बोलणे ऐकताना आपल्या प्रतिक्रिया पाहून आपण कसे आहोत हे लक्षात येईल यातून धारणे शिवाय दुसर्याचे म्हणणे कळू शकेल . यालाच खरे ऐकणे असे म्हणता येईल. म्हणजेच heart to heart talk होईल.हे खऱ्या अर्थाने दुसऱ्याला समजून घेणे असेल.मनासी होय मनाचा संवाद ते हेच होय. राम हमारा जप करे हम बैठे आराम ते हेच. यातून सुख दुखा पलीकडे जी एक विशिष्ट अवस्था निर्माण होते ती आनंदमय असेल माझे एक काका याला दु:खानन्द व सूखानन्द असे ---म्हणायचे
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel