एक होता ससा व एक होते कासव एकदा त्यांच्यामध्ये शर्यत लागली की कोण पुढे जातो दोघांनीही एकदम पळण्याला सुरुवात केली ससा हाहा म्हणता एकदम कुठच्या कुठे निघून गेला कासव मात्र हळूहळू चालत होते सशाने मागे वळून पाहिले तो कासव खूपच लांब होते तेव्हा त्याने विचार केला की आपण थोडी विश्रांती घ्यावी एका झाडाखाली सावली बघून तो तिथे विश्रांती घेऊ लागला हा हा म्हणता वाऱ्यावर  त्याला गाढ झोप लागली कासव हळू हळू चालता चालता त्याला ओलांडून पुढे गेले आंब्याच्या झाडाची शेवटची खूण ठरली होती कासव जवळजवळ झाडा पर्यंत पोचले होते एवढ्यात संशाला जाग आली तो बघतो तो कासव जवळजवळ झाडापर्यंत पोचले होते त्याने जोरात पळण्याला सुरुवात केली तेवढे तेवढ्यात कासव झाडापर्यंत पोहोचले व अशा प्रकारे कासवाने शर्यत जिंकली
           तात्पर्य 
‍१ पारंपारिक आपण  आपले काम करीत रहावे 
गति हळू असली तरी एक ना एक दिवस यश मिळतेच 
२ असमान शर्यत लावणारे मुर्ख आहेत 
३अश्या शर्यतीत भाग घेणारे कासव मूर्ख आहे 
४ असमान क्षमता लक्षात घेऊन निरनिराळी लक्षे निश्चित करणे आवश्यक होते 
५ आपण आपले काम करीत रहावे दुसऱयाबरोबर तुलना करू नये कासवाने स श्याकडे पाहिले नाहि ससा मात्र कासव खूप लांब आहे असे पाहून झोपी गेला 
६अंतिम सत्य एखाद्या घटनेकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोण असतात प्रत्येक दृष्टीकोन त्या त्या ठिकाणी बरोबरच असतो हा चूक व तो बरोबर असे मानता येणार नाही सगळे बरोबर असतात
७याहूनही वेगळे दृष्टी कोण असू शकतात 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel