पोकळी म्हणजे रिकामपणा याचा जरा वेगळ्या प्रकारे मी विचार करणार आहे. रिकाम पणाला कंटाळलो बुवा इथपासून थोडा तरी रिकामपणा पाहिजे बुवा इतपर्यंत विचार  मांडले जातात .लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकजण कशातनाकशाततरी आपल्याला गुंतवून ठेवताना आढळतो .शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या कशात ना कशात तरी गुंतून ठेवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही .याचे कारण काय असावे ?
अापण एका पोकळीत राहात असतो व ही पोकळी आपल्या अंगावर येते .मन कधी विचार शून्य असते का? नेहमी काही ना काही विचाराने ते भरलेले असते. ते भूतकाळात तरी असते किंवा भविष्यकाळात तरी असते. भूत ते भविष्य व भविष्य ते भूत असा त्याचा सतत प्रवास चाललेला असतो .एकाच विचारात आपण जास्त वेळ राहू शकत नाही .एकाच गोष्टीमध्ये वाचन खेळ करमणूक इत्यादी आपण फार वेळ राहू शकत नाही .चंचलता हा आपला स्वभाव आहे व स्थैर्याची मात्र आपल्याला ओढ असते.
जरा स्वस्थ बसून पाहा की लक्षात येईल आपण एका प्रचंड पोकळी मध्ये आहोत.आणि ती भरून काढण्यासाठी आपली वैचारिक व शारिरीक हालचाल सतत सुरू असते.ही पोकळी भरून काढण्याचे मार्ग निरनिराळे असतात .भजन पूजन नाम संकीर्तन श्रवण व्याख्यान खेळ गप्पा सामाजिक कार्य राजकीय कार्य वाचन अभ्यास संशोधन इत्यादी पोटासाठी जो उद्योग आपण करतो व कौटुंबिक कामे जी करतो ती वेगळी .प्रथम मनामध्ये म्हणजेच वैचारिक पातळीवर आपण काही निर्णय घेतो व तो नंतर प्रत्यक्ष वस्तुस्थिती मध्ये  उतरवितो.म्हणजेच मनांमध्ये व बाहेर अापण सतत  गुंतलेले असतो .त्याला अापण ज्ञान प्राप्ती समाज सुधारणा इत्यादी गोंडस नावे देत असतो. 
जरा निरीक्षण करून पाहा अापण स्वस्थ राहूच शकत नाही चंचलता हा आपला स्वभाव आहे .काही न करता पोकळीमध्ये राहण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्या मनावर प्रचंड दडपण येते व त्यातून सुटका करण्यासाठी आपण प्रयत्न करतो.ही वस्तुस्थिती लक्षात आली म्हणजे आपण काय करतो यापेक्षा ते का करतो हे महत्वाचे आहे.आपण जे करतो ते सामाजिक किंवा नैतिक पातळीवर एखादवेळ योग्य असेल किंवा अयोग्य असेल परंतु अंतिमत प्रत्येक गोष्ट पोकळी भरून काढण्यासाठी केली जाते yहे विसरून चालणार नाही .

 

 ©प्रभाकर पटवर्धन   १७/५/२०१८
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel