या दोन विचारधारा आहेत असे म्हटले तरी चालेल .एक दैववादी दुसरा प्रयत्नवादी 


 दैववादी---

या लोकांचे मत असे की प्रत्येक गोष्ट देैवाधीन आहे परमेश्वर देैव नियती प्रत्येकाचे भाग्य निश्चित करीत असते व त्या प्रमाणे त्यांची मार्गक्रमणा होत असते .देैवापुढे कुणाचंही काहीही चालत नाही जर तुम्हाला पैसा मिळणार नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही ते अयशस्वी होतील व तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नुकसानच होत जाईल. याउलट दैव अनुकूल असेल तर तुम्ही हातात माती घेतली तरी त्याचे सोने होईल .वैयक्तिक आर्थिक राजकीय सामाजिक वैवाहिक इत्यादी सर्व क्षेत्रात देैवानुसार मार्गक्रमणा होत असते.देैवाप्रमाणे अनुकूल किंवा प्रतिकूल घटना घडून येतात .देैवा प्रमाणे त्या त्या वेळी तश्या तश्या घटना घडून येतात तसेचप्रेरणाही त्याप्रमाणे मिळतात .तुम्ही कितीही प्रयत्न करा जे व्हावयाचे ते होणार, जे घडावयाचे ते घडणार .म्हणून तर असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे असे वाक्प्रचार किंवा म्हणी निर्माण झाल्या. काही जणांच्या मताप्रमाणे गेल्या जन्मी तुम्ही जे काही पुण्य व पाप केले त्यानुसार या जन्मातील तुमची मार्गक्रमणा निश्चित होत असते .पुण्य पाप पुनर्जन्म यावर बरेच काही बोलण्यासारखे आहे .

प्रयत्नवादी-----

दैव वादामुळे मनुष्य आळशी होईल.आपला देश दैवावर फार विश्वास ठेवणारा असल्यामुळे तो आळशी झाला.हातावर हात व तंगड्या वर तंगड्या टाकून बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.बुद्धीला अनेक पैलू असतात क्षमतांचे ही निरनिराळे प्रकार असतात .शास्त्रीय दृष्ट्या बुद्धीचे पैलू व एखाद्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत .त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे यश नक्की मिळेल.कधी हार मानता कामा नये जरी आपण घसरलो तरी पुन्हानव्या जोमाने उभे राहिले पाहिजे .दैववाद मनुष्याला निष्क्रिय बनवतो त्यावरील विश्वासामुळेज्योतिष पत्रिका भविष्य हस्तसामुद्रिक इत्यादी फार फोफावले आहे .हे सर्व निरुपयोगी आहे .प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे प्रयत्नांती परमेश्वर इत्यादी म्हणी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करतात.
हा वाद फार जुना आहे .मनुष्याला स्वस्थ बस असे सांगितले ,तरी तो स्वस्थ बसणार आहे काय ?काहीतरी धडपड खटपट करणे हा मनुष्याचा स्वभावच आहे . देैवा प्रमाणे योग्य किंवा अयोग्य प्रयत्न होतील .दैवात असेल तरच प्रयत्नकरण्याची प्रेरणा होईल .असे का म्हणू नये .दोघांची आपण सांगड का घालू नये ?
आपण अपेक्षा ठेवतो त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो जर अपेक्षापूर्ण झाल्या तर त्या माझ्या प्रयत्नामुळे झाल्या असे म्हणतो व स्वतःला शाबासकी देतो .जर अपयशी ठरलो तर दैव अनुकूल नव्हते असे म्हणतोदैवाला दोष देतो .यशस्वी झालो तर मी माझ्या प्रयत्नाने ,अयशस्वी झालो तर देैवानेअसा दुटप्पी विचार असतो .आपण दोन्ही डगरींवर पाय ठेवून चालत असतो .अपघात झाला तर दैवाने व त्यातून वाचलो तर परमेश्वर कृपेने असा विचार नेहमी असतो. काही जण तर मी माझ्या कौशल्यामुळे वाचतो असेही म्हणतील .दोन्ही दैवाने किंवा परमेश्वर इच्छेने होते असे आपण का म्हणत नाही ?


मुळात आपल्याला सुख हवे असते .दुःख नको असते धारणे प्रमाणे झाले तर सुख होते व त्याच्या विरुद्ध झाले तर दुःख होते. परंतु .दोन्हीचे निर्माते आपणच आहोत हेलक्षात ठेवले पाहिजे.म्हणजे सर्व काही सोपे होईल.प्रयत्नांशिवाय यश नाही व देैवाशिवाय प्रयत्न नाहीत .!!

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel