चार पाच वर्षांच्या मुलापासून ते अगदी वयस्कर वृद्धापर्यंत प्रत्येकजण आपल्या कृतीचे समर्थन करताना आपल्याला दिसेल .कोणताही विषय असो प्रत्येक जण मी म्हणतो तेच खरे ,मी करतो तेच बरोबर, असे मांडताना आढळतो. हे बोलणे वरवरचे नसते ,तर आतूनच त्याला तसे प्रामाणिकपणे वाटत असते.


पती पत्नीशी बोलताना पत्नी पतीशी बोलताना आई वडील मुलांशी मुले आई वडिलांशी मी कसा बरोबर आहे ते आग्रहीपणे सांगताना  आढळतात .ऑफिसमध्ये वरिष्ठ कनिष्ठांशी बोलताना तसाच सूर लावतात.  कनिष्ठ आपले बरोबर आहे हे सांगू शकत नसल्यामुळे ऐकून घेतात परंतु बर्‍याचवेळा त्यांना आपण बरोबर आहे असे वाटत असते .
 

पतीला घरी यायला उशीर झाला तर तो उशीर झाला असे कबूल न करता त्याची काही ना काही कारणे देत रहातो.पत्नीला स्वयंपाक करण्याला उशीर झाला किंवा घरी येण्याला उशीर झाला तरी त्याची  कारणे देण्याची प्रवृत्ती आढळते .मुलाला किंवा मुलीला परिक्षेत मार्क्स कमी मिळाले तर अभ्यास कमी केला किंवा बुद्धी कमी आहे हे  ते मान्य न करता त्याचे काही ना काही स्पष्टीकरण देताना आढळतात .जरा आसपास पाहा स्वत:कडे पहा की तुम्हाला पदोपदी अशी अनेक उदाहरणे आढळून येतील .

याची दोन कारणे सांगता येतील एक आपणच बरोबर आहोत असा असलेला ठाम विश्वास व दुसरा अापण चूक मान्य केल्यास आपल्याला न्यूनत्व .येईल असा असलेला न्यूनगंड .असा ठाम विश्वास कुठून येतो प्रत्येक व्यक्ती आपल्या धारणे प्रमाणे वर्तन करीत असते .त्यामुळे प्रत्येक जण आपण जे करतो ते बरोबरच करतो अशा प्रामाणिक समजुतीमध्ये स्वाभाविकपणे असतो.तर दुसऱ्या प्रकारात आपण जर आपली चूक मान्य केली तर आपल्याला कमीपणा येईल .न्यू नत्वाचा न्यूनगंड असतो  ,त्यामुळे लटके पण नेटके समर्थन देण्याची प्रवृत्ती असते .काही वेळा मनुष्य आपण चुकलो असे मान्य करतो परंतु ते वरवरचे असते उगीच दुसऱ्यांच्या तोंडाला कशाला लागावयाचे असा अहंभाव त्यामध्ये असतो.जर जागृतता असेल तर या सर्व गोष्टी त्याला क्षणोक्षणी उमजतील  व त्यांच्या वर्तनात फार मोठा फरक पडेल .मनच जर मनाचे निरीक्षण करील तर त्याला मनाचे हे सर्व बारकावे लक्षात येतील. मनुष्याने साधे सरळ स्वच्छ असले पाहिजे परंतु तो फारच गुंतागुंत  करून ठेवत असतो .  थोडक्यात समर्थन हे ही सर्व प्रक्रिया समजत नसल्यामुळे, जागृततेचा अभाव असल्यामुळे अस्तित्वात येते. थोर माणसे आपली चूक सहज  स्वीकारताना आढळून येतात .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel