समंजसपणा म्हणजे दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती एकाच विषयावर अनेकांची अनेक मते असू शकतात भिन्न  मतांचा आदर केला पाहिजे याची पूर्ण जाणीव असणे होय.
लोकशाहीचा हा पाया आहे दुसऱ्याच्या मताचा आदर केला पाहिज. चर्चेने संवादाने मते बदलता येता. बळाचा वापर कुठेही करता कामा नये. नाटक सिनेमा कादंबरी लघुकथा लेख  भाषण इत्यादींच्या मार्गाने प्रत्येक जण व्यक्त  होत असतो .मते न पटल्यास अापण  निरनिराळ्या मार्गांनी मते बदलण्याचा प्रयत्न करतो .आपल्या मताप्रमाणे दुसऱ्याला बदलण्याचा आकार देण्याचा यांमध्ये प्रयत्न असतो.
कायदा हातात घेता कामा नये .चर्चेतून सर्व प्रश्न सुटू शकतील .आपल्या मताप्रमाणे दुसऱ्याचे मत बदलताना आपलेही कदाचित बदलू शकते .शांततेच्या मार्गाने मत परिवर्तनावर यात भर असतो .दुसर्‍याच्या धारणेला आपल्या धारणेप्रमाणे बदलण्याचा वाकवण्याचा यात प्रयत्न असतो .
समज ही समंजसपणाहून फार वेगळी वस्तुस्थिती आहे .लहानपणापासून विविध मार्गांनी संग्रह केलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या स्मृती यांचा संग्रह म्हणजे धारणा.प्रत्येक व्यक्तीची अशाप्रकारे वेगवेगळी धारणा असते. धारणेनुसार प्रत्येक व्यक्तीची निराळी प्रतिक्रिया किंवा क्रिया असते .त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या व्यवहारांमध्ये एक प्रकारची अपरिहार्यता असते .हे स्पष्टपणे दिसणे उमगणे समजणे अंगी बाणणे म्हणजेच समज .ही वर्तनातील अपरिहार्यता ज्यावेळेला लक्षात येइल त्यावेळी आपण दुसऱ्याला दोष देवू शकणार नाही .शब्दातून मनातली भाव प्रत्येकाला व्यवस्थित मांंडता येतातच असे नाही .शब्दांतून अापण जे समजतो, ते दुसऱ्याला जे मांडायचे असते ,तेच असते असे नाही. त्यामुळे शब्दांमुळे समजाच्या ऐवजी गोंधळच वाढण्याचा संभव जास्त असतो. शब्दांशिवाय दुसर्‍यांच्या मनातील भाव जर आपल्याला कळू शकले तर त्यासारखी उत्तम गोष्ट नाही .जिथे प्रेम असते तिथे दुसऱ्याच्या मनातील भाव शब्दांशिवाय सहज कळतात .आई मूल पती पत्नी मित्र मित्र ही काही उदाहरणे.बोलल्याशिवाय दुसर्‍यांच्या मनातील आनंद खिन्नता प्रेम इत्यादी भाव सहज लक्षात आले पाहिजेत.ज्यावेळी शब्दांशिवाय दुसर्‍यांच्या मनातील भाव ,आपल्या ह्रदयात उतरतील, त्याच वेळी खऱ्या अर्थाने समज आली, असे  मानता येईल .विचार शब्दात उतरताना मनातील सर्व भाव त्यात उतरतातच असे नाही.शब्दांचा अर्थ आपण लावताना तो यथातथ्य लावतोच असेही नाही .या दोन प्रकारच्या रूपांतरात विचार संवहन बरोबर होतेच असे नाही. ‍प्रत्येकाची पार्श्वभूमी ,त्यामुळे  व त्यातून अपरिहार्यपणे निर्माण होणारी धारणा, या सर्वांचे जेव्हा आकलन होईल त्याच वेळी खऱ्याअर्थाने समज प्राप्त होईल  थोडक्यात समज म्हणजे ही संपूर्ण धारणा प्रक्रिया समजणे व दुसर्‍यांच्या मनातील भाव रूपांतराशिवाय सरळ मनात उतरणे होय.तर समंजसपणा म्हणजे  शांततेने विचारातून दुसऱ्याची धारणा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न होय .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel