जेव्हा एखादी व्यक्ती बोलते त्यावेळी अापण फक्त शब्द ऐकतो .त्यामागील भावभावना व त्यांच्या मनातील हेतू अापण पाहात नाही.किंबहुना ते आपल्याला कळत नाहीत . त्याचे शब्द आपल्या धारणेवर आपटतात.लहानपणापासून कुटुंबांमधे शाळेमध्ये वाचनातून मित्रांपासून किंवा इतर अनेक मार्गांनी अापण निरनिराळी माहिती गोळा करीत असतो हे सर्व संस्कार म्हणजेच आपले मन होय .यालाच धारणा हा शब्द वापरला आहे . जेव्हा आपण वाचतो ऐकतो पाहतो त्या वेळी हे मनातील संस्कार पडद्यासारखे मध्ये राहतात व त्यामुळे दुसऱ्याचे म्हणणे आपल्या पर्यंत पोचू शकत नाही.   मनातून जो प्रतिध्वनी येतो तोच आपण ऐकत असतो .म्हणजेच आपण आपल्यालाच  ऐकत  असतो. प्रत्यक्षात अापण आपली धारणा बाजूला ठेवून ऐकले पाहिजे. प्रत्यक्षात धारणा बाजूला ठेवता येत नाही फक्त आपण धारणा ऐकत आहोत एवढेच जागृततेतून समजते. ही सर्व प्रक्रिया जर समजली तर कदाचित आपोआपच अापण खऱ्या अर्थाने दुसऱ्याचे म्हणणे समजू शकू. याला खऱ्या अर्थाने ऐकणे म्हणता येईल. 
त्यामुळे खऱ्या अर्थाने समज प्राप्त होईल व गैरसमज निर्माण होणार नाहीत त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्याची किंवा गुणवर्णन करण्याची प्रवृत्ती राहणार नाही 
अशावेळी काही न बोलता दुसर्‍याच्या मनातील बोलणे आपल्याला कळेल यालाच गुरोस्तु मौनम व्याख्यानं शिष्यास्तु छिन्न: संशय:असे म्हणता येईल.
१ु७/४/२०१८  ©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel