आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात.

ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत.
तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच. पण, भारतात जरा जास्तच आहे असे मला तरी वाटते.

असे प्रश्न आणि व्यक्ती समोरच्याला खुप अडचणीत आणतात किंवा समोरच्याला ओशाळवाणे वाटते किंवा मनोमन चीडही येते.
प्रश्न विचारूच नये असे नाही, पण बरेचदा समोरच्याला मुद्दाम डिवचणासाठी जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते चूक आहे.

हे ते लोक म्हणजे यात- शेजारी-पाजारी, ओळखीचे, नातेवाईक यांचा समावेश होतो...

हे लोक इतरांची इथ्यंभूत माहीती विचारतात आपली माहिती मात्र सांगत नाहीत.
"आपले ठेवायचे झाकून, इतरांचे बघायचे वाकून" असला प्रकार आहे तो.

खालील उदाहरणे बघा. तुम्हालाही असा अनुभव कधीना कधी आला असेलच-

(१) आजकाल मोबाईल वर कुणालाही कॉल केला की बहुतेक वेळा असे लोक प्रश्न विचारतात- "कुठे आहेस?" समोरचा व्यक्ती कुठे आहे हे जाणणे प्रत्येक वेळा आवश्यकच असते असे नाही. त्या व्यक्तीसोबत जर असे काही बोलायचे असेल की ज्याचा त्या व्यक्तीच्या "कुठे आहेस "शी काहीच संबंध नसेल तर उगाच विचारून त्या व्यक्तीला अडचणीत कशाला आणायचे? हां, जर तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला जात आहात आणि शोधत आहात तर गोष्ट वेगळी!
काही माणसे तर हद्द करतात- मूळ बोलायचा मुद्दा बाजूला राहून ते समोरच्या व्यक्तीला विचारत बसतात-
"आजूबाजूला आवाज कसला येतोय?"
"कुठे पिक्चर मधे आहात वाटतं?"
"लग्नाची वरात चाललीय वाटतं तुमच्या जवळून!"
"आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"
... गरज नाही विचारण्याची असं!
त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे "कुठे आहेस?" विचारण्या ऐवजी- "नमस्कार! कसा आहेस? बिझी आहेस/आहात काय? ही वेळ बोलायला योग्य आहे का, की नंतर फोन करू?" असे आपण विचारू शकतो!
बाकी इतर चौकशा करायची गरजच काय?
(अपवाद- मित्र मंडळी, थट्टा मस्करीअसेल तर गोष्ट वेगळी..)

(२) सार्वजनीक ठीकाणी कुणी एस्.एम्.एस. वाचत असेल किंवा लिहीत असेल तर...
तसेच कुणी लॅपटॉपवर काही टाइप करत असेल तर...
सायबर कॅफेमध्ये शेजारच्या व्यक्तीच्या मॉनिटरवर...
झेरॉक्स काढायला येणार्‍या व्यक्तीचे खासगी कागदपत्रके...
याकडे हे लोक ढुंकून बघण्याचा प्रयत्न करतात.

(३) हे लोक लग्न झालेल्या पण अजूनपर्यंत मूल नसलेल्या जोडप्याला प्रत्येकच भेटीत, फोनवर, समारंभात सर्वांसमोर "एखादी आनंदाची बातमी आहे का?" हेच विचारत
सुटतात.यांच्या अशा "सुटलेल्या" प्रशनामागचा हेतू हाच की "सुटलेले "पोट यांना लवकर दिसावे
काही वेळा काही कारणास्तव एखाद्या जोडप्याला मूल होत नसले तरी हे माहिती असूनही जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतात...

(४) बाहेर जात असलो की हे विचारतात -"कुठे? बाहेर चाल्लेत का?
किंवा विचारतात-"कुठे चालले?"
अगदी आवश्यकता नसली तरी विचारतातच!

(५) आपण काही वस्तू खरेदी केली की, आपल्याला ते विचारतात "केवढ्याला घेतली?" अगदी विचारतातच! यांना प्रश्न विचारल्याशिवाय राहावले जात नाही.
कींमत सांगताच बरोबर यांचे पुढचे वाक्य तयार- " महाग पडली हो तुम्हाला? अमुक ठिकाणी ही वस्तू फक्त इतक्यालाच मिळते.. मी आणली मागच्याच आठवड्यात! " खरे खोटे तो दुकानदारच जाणो..!
किंवा- "बापरे! एवढी स्वस्त... अहो लवकर खराब होईल..आम्ही स्टॅण्डर्ड वस्तु आणतो!"(मात्र आमचे प्रश्न विचारण्याचे स्टॅण्डर्ड मात्र खालच्या दर्जाचे आहे..)
ते बोलणारच. याउलट काही लोकांना नाही विचारलं तरी वस्तूंच्या किंमती सांगत बसण्याची हौस असते.

(६) एखाद्याला नोकरी लागताच बरोबर "पगार किती मिळतो?" हे ते अगदी वीजेच्या वेगाने विचारणार. तेही अगदी चार्-पाच लोकांसमोर. अ- आणि सु- शिक्षीत दोन्ही प्रकारचे लोक असा प्रश्न विचारतात.
पगार ही खासगी गोष्ट असते. तो असा सऱळसरळ विचारूच नये (आणि आडमार्गाने सुद्धा!) कारण, जास्त - कमी कसाही असला तरी त्या व्यक्तीला ते सांगणे बरोबर वाटत नाहीच. याउलट काही लोकांना नाही विचारलं तरी पगार सांगत बसण्याची हौस असते. नोकरदार व्यक्तींना अडचणीत आणाण्याचा हा त्यांचा मार्ग.
मात्र, एखादा व्यापारी (बिझिनेसमॅन) असेल तर त्यांना मात्र " तुमचा वार्षिक नफा, जमा खर्च किती असतो हो?" असे हे विचारायची हिंमत करतील का?
करतीलही बुवा! काही सांगता येत नाही त्यांचं!
किंवा- "आता काय बुवा मज्जा आहे तुमची. तुम्ही आणि तुमची मिसेस दोन्ही नोकरी करतात." असे काहींना म्हणतात.

(७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय. रस्त्यात कुणी नसले तरिही ते भोंगा वाजवतच राहातात.
"ऑबसेसिव्ह कंपल्सिव भोंगा डीस ऑर्डर" हा रोग झाल्या सारखे.

(८)सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल/हात न लावता शिंकणे;
रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे;
वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे,
रस्ता मोकळा न करणे.

(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे (न विचारता) सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर "विरजण " पाडून त्या व्यक्तीच्या मुड ऑफ करून त्याचे "दही" करतात. एखाद्याने विचारले तर गोष्ट वेगळी.. तसेच सिनेमा पाहून आल्यावर उगाच स्टोरी विचारत बसतात.

(१०) बँक, पोस्ट ऑफिस, रिझर्वेशन काउंटर येथे रांगेमध्ये हे लोक पेन सोबत आणत नाहीत. इतरांकडे मागतात. (कुणी पेन देता का पेन?) बरेचदा खिशाला लावलेला पेन विनंती करता करता काढून घेतात. आपला नंबर आला की प्रथम यांना शोधत बसावे लागते. (माझा पेन मला परत द्या)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel