आजकाल सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये जवळपास रोजच विविध देशांमधील पाहणीचे आणि सर्वेक्षणाचे निकाल छापलेले असतात.

उदा. चहा, सिगारेट पिणाऱ्यांपेक्षा, ते न पिणारे लोक दिर्घायुषी असतात वगैरे वगैरे.

दहा- पंधरा वगैरे वर्षे ते लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून मग शेवटी एक निष्कर्ष काढला जातो. तो आपण वाचतो. बरेचदा आपल्याला तो मान्यही असतो. मान्य करण्याइतपत तो मुद्दा पटवून सांगितलेला असतो. बरोबर आहे. पण त्यालाही काही अपवाद मात्र सापडतात. म्हणजे ते सर्वेक्षण १०० टक्के कधीही लागू होत नाही. कारण, प्रत्येक नियमाला अपवाद असू शकतो. ( उदा. अगदी कसलेच व्यसन नसलेले लोकही बरेचदा काहीही कारण नसतांना आजारी पडतात व इतरांपेक्षा लवकर मृत्यू ला सामोरे जातात. )

तसेच बरेचदा आपण पूर्वीच्या लोकांनी अनुभवातून तयार केलेल्या म्हणींनुसार घडलेले बघतो. पण अगदी शंभर टक्के तसेच घडते आणि तेच प्रत्येक ठिकाणी लागू पडतेच असे नाही. पण म्हणून आपण त्या म्हणी आणि सुविचार लगेच खोट्या ठरवत नाही.... (उदा : अडला हरी गाढवाचे पाय धरी... पण याचा अर्थ असा नाही ही, शंभर टक्के प्रसंगांत अडलेला, अडचणीतला माणूस फक्त मुर्ख व्यक्तीचेच पाय फक्त धरेल? खरोखर चांगला माणुससुद्धा त्याला मदत करू शकतोच की!)

(उदाः सत्यमेव जयते, नेहेमी खरे बोलावे ... हे आपण शंभर टक्के पाळतो का? नाही. तसे शक्यही नाही. पण म्हणून खरे बोलून उपयोगच नसतो, असेही नाही, म्हणजे सुविचार, "म्हण" ही निरुपयोगी नक्कीच नाही! पण १०० टक्के उपयोगीही नाही!!)

मग, ज्योतिषी जेव्हा आपल्याला कुंडलीतील विशिष्ट ग्रहयोगावरून काही भविष्यातील किंवा घडून गेलेल्या घटना सांगतात तेव्हा मात्र आपण त्यांना अगदी काटेकोर विज्ञानाच्या नियमांत बसवून का पडताळत बसतो? सर्वेक्षनाप्रमाणेच, ज्योतिषशास्त्रात, समजा एक विशिष्ट ग्रहयोग असलेल्या ७० टक्के व्यक्तींच्या जीवनात एक ठरावीक घटना घडलीच आहे. मग ते खरे मानायला काय हरकत आहे? की विज्ञानवादी त्याला एक योगायोगच मानतील? की मुद्दाम असेच म्हणणार की, उरलेल्या ३० टक्के लोकांच्या बाबतीत तशी घटना का घडली नाही? मग सर्वेक्षणाच्या निष्कर्षाला सुद्धा ते योगायोग म्हणतील का?

अगदी बारीक सारीक तपशीलांसह जो ज्योतिषी अभ्यास करतो त्याचे निकाल शंभर टक्के सुद्धा खरे ठरले आहेतच की! ज्योतिषशास्त्राच्या पूर्ण आहारी जावे असे मी म्हणत नाही, पण त्याचा मार्गदर्शक म्हणून नक्की उपयोग होईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel