(१५) का अशी रागावली रागावली रागावली ती?

[व्हाय धिस कोलावारी या गाण्याचे विडंबन]

सूचना: हे गाणे घ्या तुम्ही गमतीवरी गमतीवरी जी !!
-----
का अशी रागावली रागावली रागावली ती ?
दूर वर बसला चंद्र चंद्र..
चंद्राचा रंग पंधरा फट्ट !
शुभ्र शुभ्र प्रकाशात ..
रात्र मात्र काळीकुट्ट !

का अशी रागावली रागावली रागावली ती ?

मुलगी मुलगी गोरी गोरी..
माझे हृदय केले तीने चोरी !
डोळे डोळे भिडले भिडले ..
माझे भविष्य अंधारले !

का अशी रागावली रागावली रागावली ती ?

हातात पेला, दारूने भरला..
डोळे रडून रडुन ओले !
जीवन एक्काकी , पोरगी आल्ली ..
जीवनात मज्जा आली !

प्रेम प्रेम, तुझे-माझे प्रेम..
ओल्या पावसात आपण न्हाऊअ !
जाऊअ जाऊअ आपण जाऊअ ..
खंडाळ्याला फिरून येऊअ अ अ ....!!

का अशी राग्गावली राग्गावली रागावली ती ?

भाऊअ भाऊअ, अरे भाऊअ..
गाणे पूर्ण एक, नको जाऊअ !
देवा आता नाचलो मी...
हर्षाने वेडावली ती ! 
हीच माझी चॉइस आता ..
नाही दुसरा पर्याय्-अअ अ ....

का अशी ....

(१६) सांगू काय?

विडंबन- सांगू काय?
["एका माणसाची दाढी केवढी लांब सांगू काय ...." या एका बालगीताच्या चालीवर खालील कवीता वाचावी.]
(वरील बालगीत फाउंटेन कंपनीच्या च्या एका बालगीतांच्या व्हि‌. सी. डी. मध्ये आहे. ते 'यु ट्युब' वर शोधले तरी मिळू शकेल.)


एका मॉडेलची वस्त्रे केवढी छोटी, सांगू काय ?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढी छोटी, एवढी छोटी की,
रॅंपवर चालतांना गळून जाय....
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ १ ॥

एका चॅनेलाची बातमी इतकी खरी, सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
इतकी खरी, इतकी खरी की,
राजा हरीश्चंद्रही लाजून जाय ...
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ २ ॥

एका क्रिकेटपटूच्या खेळाची महती, इतकी मोठी सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
इतकी मोठी, इतकी मोठी की...
अनेक अभिनेत्रींशी त्याची काडी जोडून, मोडून जाय ...
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ ३ ॥

एका चित्रपटाचे गाणे एवढे आक्षेपार्ह सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढी आक्षेपार्ह एवढी आक्षेपार्ह की,
सगळीकडे जाळपोळच होवून जाय ...
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ ४ ॥

एका अभिनेतत्रीचा फोटो एवढा अश्लील सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढा अश्लील एवढा अश्लील की,
सगळीकडे वर्तमानपत्रात पुन्हा पुन्हा छापला जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ ५ ॥
एका मॉडेलच्या चपला केवढया उंच, सांगू काय ?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढ्या उंच, एवढ्या उंच की,
रॅंपवर चालतांना मॉडेलच पडून जाय....
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ ६ ॥

एका शहरातील रस्त्यावरचे खड्डे इतके मोठे सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय?
इतके मोठे, इतके मोठे की,
एखादा माणूस त्यात सहजच मावून जाय! ॥ 7 ॥
शहरांतील खड्ड्यांबाबत सरकार एवढे उदासीन सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय?
एवढे उदासीन , एवढे उदासीन की,
'लीटमस पेपरच' रागा रागाने लाल होवून जाय! ॥ 8 ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel