(या लेखात काही वैज्ञानीक संदर्भ घेतले आहेत, ते मी वाचलेल्या माहितीवर आधारीत आहेत, ते चुकलेले असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावेत. )
स्वप्ने, पूर्वाभास, टेलिपॅथी, बाधा, मनकवडेपणा, मल्टिपल पर्सनॅलीटी डिसऑर्डर आणि पुनर्जन्म- यांना आपण तर्कहीन सात गोष्टी म्हणू.

(1) स्वप्ने ही आपल्याला "घडणाऱ्या, घडत असलेल्या किंवा घडून गेलेल्या" घटनांबद्दल काहितरी सूचवत असतात हे आजपर्यंत अनेकांनी अनुभवले आहे आणि मान्य केले आहे. स्वप्नातले जसेच्या तसे घडत नसले तरी ते प्रतिकात्मक सुद्धा असू शकते व त्यातून योग्य अर्थ लावता आला पाहिजे. स्वप्न आणि त्यांचे अर्थ यावर भारतात पूर्वीपासून संशोधन झाले आहे.
परदेशांतही सिग्मंड फ्रॉइड याने यावर "इंटर्प्रिटेशन ऑफ ड्रिम्स" असे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. म्हणजे स्वप्ने आपल्याला एक प्रकारचा पूर्वाभास देत असतात. म्हणजे इंट्यूशनचाच हा एक प्रकार म्हटला पाहिजे.
तसेच-
(2) पूर्वाभास - इंट्यूशन किंवा एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन (इएसपी)
(3) मनकवडेपणा - एखाद्या व्यक्तीच्या मनातले ओळखणे
(4) टेलिपॅथी- दूरवरच्या व्यक्तीच्या मनातले विचार ओळखणे
(5/6) बाधा/पुनर्जन्म - म्हणजे एखादा जीवंत व्यक्ती मृत व्यक्तीप्रमाणे बोलायला लागणे व त्याविषयी माहिती देणे.
(7) मल्टिपल पर्सनॅलीटी डिसऑर्डर - एकाच व्यक्तीत आलटून पालटून अनेक व्यक्तीमत्वे राहात असणे.

.... या सगळया गोष्टींचे स्पष्टीकरण वैज्ञानिक दृष्ट्या एकाच पद्धतीने आपण देवू शकतो असे मला वाटते.
(या लेखात काही वैज्ञानीक संदर्भ घेतले आहेत, ते मी वाचलेल्या माहितीवर आधारीत आहेत, ते चुकलेले असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावेत.)
माणसांच्या मनात दिवसभर अनेक विचार चक्रे सुरू असतात.

विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की मानवाच्या विचारांच्या प्रकारानुसार व तीव्रतेनुसार काही विशिष्ट प्रकारची किरणे/लहरी डोक्याबाहेर कमी अधिक प्रमाणात पडत असतात.
त्या अदृश्य प्रकाशकिरणांना औरा म्हणतात.
कुणी एखादा बेत तडीस नेण्याचा विचार करत असेल, तर कुणी काही इतर विचार करत असेल. विचार जेवढे तीव्र तेवढे जास्त वेळ ते वातावरणात साठून राहातात व तितक्या दूर प्रवास करतात, असे आपण गृहित धरले तर ते विचार एखाद्या संवेदनक्षम माणसाच्या मेंदूत प्रवेश करून अशा प्रकारे त्याला काहितरी पूर्वाभासात्मक सूचना देवू शकतात.
ते विचार स्विकारण्याकरता त्यावेळी मेंदू विशिष्ट स्थितीमध्ये ट्यून्ड असला पाहिजे.
जसे टेलीकम्यूनिकेशन मध्ये रेडियो लहरी प्रक्षेपीत केल्या जावून त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सी- वारंवारिता असलेल्या रेडीयो स्टेशन वर ट्यून होवून ऐकायला मिळतात त्याचप्रमाणे.
मग याद्वारे तर्कहीन सातही गोष्टींचा उलगडा झाल्यासारखा वाटतो!!!
म्हणजे, मृत व्यक्तीचे विचार एखाद्याचा मेंदूत शिरून त्याच्या मेमरीत आपोआप साठवले जावू शकतात.
कुठेतरी मी असे वाचल्याचे आठवते की आपण जे बोलतो ते सुद्धा म्हणे वातावरणात सूक्ष्म रूपाने कायमचे कोरले जाते. म्हणजे नैसर्गिक रेकॉर्डींग. ते पुन्हा कसे ऐकायचे हे मात्र कुणी सांगू शकत नाही. भविष्यात विज्ञानाच्या आधारे यावर संशोधन होईलही!
मग पुढे कदाचीत या सर्व गोष्टींवर आपल्याला त्यावर नियंत्रण मिळवणे सुद्धा शक्य होईल...

म्हणजे असे की कोणत्या प्रकारच्या व्यक्तीचे कोणत्या प्रकारातले विचार नेमक्या कोणत्या माणसाकडे व कसे पोचवायचे वगैरे. मग ही "ह्युमन टेलीकम्युनीकेशन" नावाची एक क्रांतीच होईल असे वाटते.

आपल्याला काय वाटते?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel