(यात कुणालाही, कशालाही दुखावण्याचा हेतू नाही. फक्त मनोरंजन आणि विनोदनिर्मितीसाठी मी हे लिहिले आहे.)

आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे.

तुम्हीही सुचवू शकता प्रतिक्रियेद्वारे अशी काही गमतीदार नावे:

•थरारक सासू - दी अल्टीमेट टॉर्चर
•बावरलेला नवरा - नवरा अंडर फायर
•माहेरचं मांजर- कॅटवूमन गेम
•मांजरीचं माहेर
•आहेर फेकला बाहेर
•बाहेरचा आहेर- एका अयशस्वी आहेराची कथा
•माहेरचा तवा- द "फ्राय" स्टोरी
•लेक चालली सासरला (वर्षातून एकदा)
•जाऊबाईच्या नणंदेची सासू- द अल्टीमेट रिलेशन्शीप
•खवळलेली सासू- चवताळलेली सून - एक जगजाहिर जुगलबंदी
•चतुर कावळा - भोळी मैना- एका पक्षीप्रेमीची कथा
•एका मामे-सासूची गोष्ट
•नणंद बनवी भडंग- चविष्ट कथा
•सासूचा थयथयाट - एका नृत्यप्रिय खाष्ट सासूची कर्मकहाणी
•डोंबिवलीच्या सासूबाई खाष्ट - (डोंबिवली फास्ट चे सासू व्हर्जन)
•माझी लेक- तुझी सून
•माझ्या सूनेचा सासरा
•थांब सुने केस ओढते! (द्वंद्व कथा)
•सासऱ्याच्या सासूचं माहेर
•सासूच्या सासऱ्याच्या माहेरचा कचरा- गंभीर होत चाललेल्या कचराप्रश्नावर जळजळीत भाष्य
•माहेरची गाडी
•माहेरची फ्लॉपी - करूया कॉपी
•माहेरची हार्ड डिस्क-एक रिस्क
•९ गिगा बाईट चा आहेर
•डीजीटल आहेर
•काका-नाना-मामा-दादा....
•स्टीलचा गॅस
•हळद झाली पिवळी
•हळद पुसली- कुंकू धुतलं
•सासू ऍट द रेट आदळापट डॉट संताप-फिमेल्सची इमेल कथा
•धाकटा बोका
•शाब्बास सूनबाईची सासू!
•सासरा पळाला सासरी
•भावजयीचा भाचा- नणंदेचा नाना
•भावाची भाभी
•भुताचा भाचा
•सासवेची आसवं...

आजकाल मराठी, हिंदी चित्रपटांची शिर्षके ही तीन नावांची बनलेली असतात. तशी फॅशनच आली आहे.

उदा: मी, मन आणि ध्रुव; लव, * और धोका; हम, तुम और घोस्ट; मै, मेरी पत्नी और वो!

मग जरा माझ्यासारख्या व्यंगचित्रकाराच्या तिरसट चष्म्यातून (किंवा डोळ्यातून म्हणा) मला अशीच तीनतीनाटी नावे अजून सुचू लागलीत.


ती, तो आणि हो!
कृषीमंत्री, कांदे आणि खाण्याचे वांधे
सोम्या, गोम्या आणि नाम्या
जोरु, दारू आणि नारु
आबा, बाबा आणि लोकलचा तिसरा डबा
हम, तुम और क्रिस्पी टोस्ट
शिक्षण, भक्षण आणि शोषण
आयपीएल, ट्वेंटी-ट्वेंटी आणि शेती
पक्ष, अपक्ष आणि भक्ष्य
विहिर, राज आणि अमिताभ
जया, कढी और द्रोण
सानिया, कहानिया और दुनिया
सासू, सून आणि कटकट
मी, शरीर आणि आत्मा
गल्ली, गोंधळ आणि गजरा
लाजरा, साजरा आणि मुखडा
मी, हा चंद्र आणि तो सूर्य
मी, माझे लाडके बाबा आणि माझा मवाली प्रियकर
मीताली, गीताली और दे ताली!
दूध, खवा आणि म्हैस.
शिर्षक, वाद आणि मांजर
दर्पण, तर्पण आणि सरपण
पुणे, उणे रस्ते आणि अधिक खडड्डे
मी, माझे मन आणि तीचा मेंदू
लंडनची सकाळ, पॅरिसची दुपार आणि चंद्रावरची संध्याकाळ
आमचा , तुमचा आणि सगळ्यांचा
अग्गंबाई, इस्श्य आणि हुश्श्य
मुद्दा, हुद्दा, आणि गुद्दा
झपाटलेला, पछाडलेला आणि तळलेला
मी, माझी बॉडी आणि माझी अपघाती गाडी
सरकारी नोकरी, खोका आणि धोका


आणि एकता कपूरच्या क छाप सिरियल्स -

•क्यों की कुत्ता भी कभी काटता था
•कुसूम के काकी के कौवे की कसम
•कौन किसको काटे?
•क्या करू कमला?
•कमला करे काम
•कैसी कैसी कहानी!!
•कब कैसे कौन कौन कही कही
•कहानी कामचोर की
•कुसूम के काकी के काका की कागज की कश्ती की कहानी
•कसौटी कुसुम के कैची की ( एका लेडीज टेलर ची कथा )
•कसलेली सासू - कच्ची सून
•कुसूमच्या माहेरची कच्ची कैरी
•कैरी झाली आंबा
आजकालच्या मालिकांची मजेशीर 'विवाहबाह्य' नावे!
(एकता कपूर च्या मालीकांमध्ये अगदी प्रमाणाबाहेर, अजीर्ण होईल ईतके विवाहबाह्य संबंध दाखवले जातात. त्यामुळे तो काळ आता दूर नाही की मालिकांची नावे खालील प्रमाणे असतील)

•पहले पती की पहली शादी
•मेरे चौथे पती के सातवे लडके की तिसरी गर्लफ्रेंड
•अगली करवाचौथ नया पती
•कौनसा पती?
•दो नंबरी पती
•पॉचवे पीया का घर
•पहले पती का पता
•तेरा तिसरा पती सिर्फ मेरे पहली पत्नी का है
•हमारा पती
•मरी गर्लफ्रेंड के पती का बॉयफ्रेंड
•कौन किसका पती?
•मेरे पेहले पती का दुसरा पाप
एकता कपूर प्रायोजीत परीक्षा:

प्रश्न १ : योग्य पती निवडा व योग्य पत्नी शी जोड्या लावा

प्रश्न २ : खाली दिलेल्या नायिकांची दुसरी लग्ने कधी झाली, कशी व का मोडली ते एका वाक्यात स्पष्ट करा.

प्रश्न ३ : एका जन्मात सात लग्ने, तर एकूण फेऱ्यांची संख्या किती?

प्रश्न ४ : एका वर्षाच्या आत दोन लग्न केलेल्या नायिका किती ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


पलीकडचा मी! (कूटकथा)
२२२ सुपर सुविचार
वाचनस्तु
"आग्या वेताळ" - एक गूढकथा
रूम नंबर 9
चोवीस चारोळ्या
जलजीवा
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह