संस्कृत भाषेतील दोन अतिप्राचीन महाकाव्यांपैकी एक महाकाव्य कृष्णद्वैपायन व्यासांचे महाभारत हे होय; दुसरे महाकाव्य म्हणजे वाल्मीकी मुनींचे रामायण होय. भारत हा शब्द पाणिनीच्या व्याकरणात (अष्टाध्यायी ४-२-५६) भरत या नावाच्या मानववंशाचा संग्राम या अर्थी सिद्ध केला आहे. या अर्थी सिद्ध केलेल्या भारत या शब्दाला महान्हे विशेषण पाणिनीने (६−२−३८) लावून महाभारत हा शब्द सिद्ध केला आहे. भरत लोकांचे महायुद्ध असा याचा अर्थ होतो. म्हणून या महायुद्धाच्या कथेला भारत किंवा महाभारत हे नाव दिले. प्रतिपाद्य विषयाचे नाव प्रतिपादक ग्रंथाला दिले जाते. उदा., कालिदासाचे रघुवंश  हे महाकाव्य.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel