भारत हा शब्द पाणिनीच्या व्याकरणात भरत या नावाच्या मानववंशाचा संग्राम या अर्थी सिद्ध केला आहे. या अर्थी सिद्ध केलेल्या भारत या शब्दाला ‘महान्’ हे विशेषण पाणिनीने लावून महाभारत हा शब्द सिद्ध केला आहे. भरत लोकांचे महायुद्ध असा याचा अर्थ होतो. म्हणून या महायुद्धाच्या कथेला भारत किंवा महाभारत हे नाव दिले.