करूयुद्ध झाल्यानंतर ३६ वर्षांनी पांडवांना पुन्हा धक्कादायक वार्ता मिळाली की गांधारीच्या शापामुळे यादव वंशासह कृष्णाचा नाश झाला आहे.
ऋषीच्या शापामुळे यादव मद्य पिऊन बेहोश झाले आणि सर्वांनी आपापसांत युद्ध करून एकमेकांना ठार मारले. सर्व यादवांचा निःपात झाला.
बलरामानेही आपला अवतार संपवला. कृष्ण वनात जाऊन समाधी लावून बसला असताना एका व्याधाने त्याच्यावर मृग समजून बाण मारला; त्याच्या पायात तो गेला व त्याची अवतारसमाप्ती झाली.
रूक्मिणी, हेमवती, जांभवती इ. काही कृष्णपत्न्यांनी अग्निप्रवेश केला. सत्यभामेने तपश्चर्येसाठी वनाचा आश्रय घेतला.
उरलेल्या परिवारास घेऊन अर्जुन द्वारकेतून बाहेर पडला. पाठोपाठ समुद्राला उधाण येऊन द्वारका समुद्राच्या पोटातगडप झाली.
अर्जुन राहिलेल्या यादव स्त्रियांसह हस्तिनापुरात येत असता वाटेत वन्य जनांनी अर्जुनावर हल्ला केला; लुटालूट केली आणि यादव स्त्रियांना पळवून नेले.
वाटेत व्यासांच्या आश्रमात अर्जुन आला तेव्हा व्यासांनी सांगितले की, आता सर्व संपले आहे; पांडवांनी महाप्रस्थान ठेवावे.